पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांना घ्यावी लागली रस्स्त्याच्या कडेला उभं राहून फोनवरूनच सभा? पहा नेमकं घडलं काय?
Dr. Amol Kolhe | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी सध्या निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. विधानसभा निवडणूक रणधुमाळीमध्ये सध्या नरेंद्र मोदी देखील सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र दौर्‍यावर असलेले नरेंद्र मोदी यांच्यामुळे काल राष्ट्रवादी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने त्यांना रस्त्याच्या अक्डेला उभं राहून सभेला संबोधित करावी लागल्यची फेसबूक पोस्ट त्यांनी लिहली आहे. फेसबूकच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराचा अनुभव सांगताना,'ऐनवेळी पूर्वपरवानगी असतानाही एरंडोल मधून हेलिकॉप्टर उड्डाणासाठी परवानगी नाकारण्यात आली..मग औरंगाबाद येथे जाऊन चार्टर्ड विमानाने पुणे येथे येण्यासाठी प्रयत्न केला. पण पंतप्रधान सर्किट मध्ये नसताना औरंगाबादची परवानगी सुद्धा नाकारण्यात आली असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान एरंडोल हून पुण्याला जाताना रस्त्याच्या कडेला उभं राहून त्यांनी सभा घेतली.

दरम्यान अमोल कोल्हे यांची काल पिंपरी चिंचवड आणि भोसरीमध्ये सभा होती.

भोसरीमध्ये विधानसभेचे राष्ट्रवादी पुरस्कृत विलास लांडे आणि चिंचवड येथे राहुल कलाटे यांच्यासाठी तर पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.

अमोल कोल्हे यांची फेसबूक पोस्ट

21 ऑक्टोबर दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी 288 मतदार संघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबर दिवशी मतमोजणी पार पडणार आहे.