महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून पुन्हा एकदा एनडीएकडे (NDA) बहुमताचा आकडा झुलकलेला दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असून मुंबईत भाजप 5 हजार लाडू वाटप करणार आहेत. तर आता एनडीएने बहुमताचा आकडा पार केला असून विजयासाठी 22 जागांपासून दूर आहेत. पण आज संध्याकाळ पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार कोणाचे सरकार येणार हे कळणार आहे. मात्र ताज्या अपडेट्सनुसार राज्यभरात भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. एनडीएन आता आघाडीवर असून युपीए 98 जागा आणि अन्य 30 जागांवर आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
एनडीएने काँग्रेसला पिछाडीवर टाकले आहे. तसेच नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आघाडीवर आहेत. एनडीएने आता 151 जागांवर आघाडी केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच एनडीएन जादुई आकडा आता लवकरच पार करेल असे दिसून येत आहे. बहुमताने सरकार बनवण्यासाठी 145 जागांची आवश्यकता आहे.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 Live Updates: राज्यातील विधानसभा 288 जगांवरील कल स्पष्ट; जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने)
#UPDATE Election Commission official trends for #MaharashtraAssemblyElections: BJP leading in 99 constituencies, Shiv Sena leading in 60 constituencies, NCP leading in 48 constituencies & Indian National Congress in 40. pic.twitter.com/0Y5AO4B2HU
— ANI (@ANI) October 24, 2019
दरम्यान, विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात 288 जागांवर भाजपने 164 जागा आणि शिवसेनेने 288 जागांवर निवडणूक लढवली. तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या होत्या. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांनी अमुक्रमे 147-124 जागांवर निवडणूक लढवली. मात्र आता उद्या निवडणूकीचे निकाल सष्ट होणार असून कोणाची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.