महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव ते कर्जत-जामखेड मतदार संघाचे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या
Ahmednagar Assembly constituency (Photo Credit: File Photo)

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ येतात. नेवासे, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर, अकोला, कर्जत-जामखेड, श्रीगोंदा, अहमदनगर, पारनेर, राहूरी, शेवगाव अशी या मतदारसंघांची नावे आहेत. शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे फॅक्टरही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक विविध अंगाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी तर 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.

 

शेवगाव मतदारसंघ क्रमांक- 222

पाथर्डी आणि शेवगाव मतदारसंघ 2009 च्या आधी वेगवेगळे मतदारसंघात होते. परंतु, 2009 च्या विधानसभा निवडणुकीनंतर हे दोन्ही मतदारसंघ एकत्र करण्यात आले. मात्र दोन्हीही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. भाजपच्या आमदार मोनिका राजीव राजळे यांचा विजय झाला होता. काँग्रेस पक्षाचे नेत चंद्रशेखर धुळे हे विरुद्ध उभे होते. या निवडणुकीत राजळे यांना 1 लाख 34 हजार 685 मत पडली होती.  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये शेवगाव मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- मोनिका राजाळे (भाजप), प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी), किसन चव्हान (वंचित बहुजन अघाडी)

राहूरी मतदारसंघ क्रमांक- 223

राहुरी मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यात येतो. विधानसभा निवडणूक 2014 साली भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कार्डीले यांनी मोठा विजय मिळवला होता. शिवसेना पक्षाच्या श्रीमती डॉ.उषा तानपुरे या कर्डिले यांच्याविरुद्ध उभे होत्या. या निवडणुकीत कर्डिले यांना 91 हजार 454 मत पडली असून त्यांनी तानपुरे यांचा 25 हजार 676 मतांनी पराभव केला होता.  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राहूरी मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- शिवाजीराव कार्डिले (भाजप), प्राजक्ता तनपुरे (काँग्रेस)

पारनेर मतदारसंघ क्रमांक- 224

पारनेर मतदारसंघ गेल्या 3 विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना पक्षाचे आमदार विजय औटी यांच्या ताब्यात आहे. विधानसभा निवडणूक 2014 साली औटी यांनी राष्ट्रवादीचे नेते वसंतराव झवरे पाटील यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत औटी यांना 73 हजार 263 मत पडली असून पाटील यांना 45841 मत मिळाली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पारनेर मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- विजय औटी (शिवसेना), निलेश लंके (राष्ट्रवादी)

अहमदनगर मतदारसंघ क्रमांक- 225

अहमदनगर मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. अहमदमतदारसंघात शिवसेना पक्षाचे नेते अनिल राठोड यांनी सलग पाचवेळा विजय मिळवला आहे. मात्र, विधानसभा निवडणूक 2014 साली हे गणित पूर्णपणे बदलले असून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी अनिल राठोड यांना पराभूत केले होते. या निवडणुकीत संग्राम जगताप यांना 49 हजार 378 मत मिळाली होती तर अनिल राठोड यांना 46 हजार 061 मत पडले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये अहमदनगर मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- अनिल राठोड (शिवसेना), संग्राम जगताप (राष्ट्रवादी)

श्रीगोंदा मतदारसंघ क्रमांक- 226

श्रीगोंदा मतदारसंघ हा माजी आमदार बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. विधानसभा निवडणूक 2014 चा पराभव सोडला तर, पाचपुते यांचा सलग सहावेळा या मतदारसंघात विजय मिळवला होता. राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी पाचपुते यांचा गेल्या निवडणुकीत पराभव केला होता. जगताप यांना 99 हजार 281 मते पडली होती तर, पाचपुते यांना 85 हजार 644 मत मिळाली होती.  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये श्रीगोंदा  मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- बबनराव पाचपुते (भाजप)

कर्जत-जामखेड मतदारसंघ क्रमांक- 227

कर्जत- जामखेड मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भाजप गेल्या 25 वर्षापासून कर्जत-जामखेड मतदारसंघात विजय मिळवत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 साली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांचा 84 हजार 058 मतांनी विजय झाला होता. शिंदे यांच्या विरोधात शिवसेना पक्षाचे रमेश खाडे उभे होते. खाडे यांना या निवडणुकीत 46 हजार मत पडली असून ३७ हजार ८१६ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे-प्रा. राम शिंदे (भाजप), रोहित पवार (राष्ट्रवादी), समता इंद्रकुमार भिसे (अपक्ष)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.