देवेंद्र फडणवीस (Photo Credits- ANI)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Assembly Elections) अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. शुक्रवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर साऊथ वेस्ट (Nagpur South West) येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता फडणवीस यांची संपत्ती किती आहे हे समोर आले आहे. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि परिवाराच्या एकूण संपत्तीत 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या मुंबईतील अॅक्सिस बँकेच्या मुख्याधिकारी आणि पश्चिम इंडियाच्या कॉर्पोरेट हेड आहेत. फडणवीस यांच्या संपत्तीत किती वाढ झाली हे निवडणूक आयोगाला दिलेल्या माहिती मधून समोर आले आहे.

नागपुर साउथ वेस्ट येथून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर फडणवीस यांनी त्यांची किती चल-अचल संपत्ती आहे हे सांगितले आहे. जर 2014 मधील फडणवीस यांच्या संपत्ती सोबत तुलना केल्यास तर गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत जबरदस्त वाढ झाली आहे. याबाबत सीएमओ (CMO) यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या एका विधानात असे म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत वाढ ही प्रॉपर्टी रेट मध्ये वाढ झाल्यामुळे झाली आहे. तर 2014 मधील 1.81 कोटी रुपयांच्या तुलनेत आताची संपत्ती 3.78 कोट्यावधी रुपयांच्या बरोबर आहे. अमृता फडणवीस यांची संपत्ती 2014 मध्ये 42.60 लाख वरुन आता 99.3 लाख रुपये झाली आहे.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: 'भाजपा' च्या चौथ्या उमेदवार यादीमध्ये रोहिणी खडसे यांची वर्णी; विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना डिच्चू)

तसेच 2014 मध्ये फडणवीस यांच्याकडे 50 हजार रुपयांची रोकड आता 17,500 रुपयांवर आली आहे. तसेच अमृता फडणवीस यांच्याकडे 12,500 रुपये झाले असून 2014 मध्ये 20 हजार रुपये होते. बँकेत एकूण जमा रक्कम 1,19,630 रुपयांनी वाढून 8,29665 रुपये झाली आहे. ही रक्कमेतील वाढ त्यांचे वेतन आणि भत्त्यातील वाढीमुळे आहे.अमृता फडणवीस यांच्या बँक खात्यात 2014 मध्ये 1,00,881 रुपयांवरुन 2019 मध्ये 3,37,025 रुपये झाली आहे. अमृता यांनी शेअर मार्केट मध्ये सुद्धा गुंतवणूक केली आहे. त्याची 2014 मध्ये किंमत 1.66 कोटी रुपयांनी वाढू 2.33 कोटी रुपये झाली आहे.