Amit Shah in Maharashtra: राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने सिंचन योजने मधील 70 हजार कोटी रुपये खाल्ले, अमित शहा यांचा आरोप
File image of BJP chief Amit Shah | (Photo Credit: IANS)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकीचा मुद्दा लक्षात घेता आज (13 ऑक्टोबर) भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आले. त्यावेळी अमित शहा यांनी रॅलीला संबोधित करत प्रथम लोकसभा निवडणूकीत जनतेने पाठिंबा दिल्याने आभार मानले. तसेच केंद्र सरकारने जम्मू-कश्मीर येथून कलम 370 हटवल्याच्या मुद्द्यारुन ही शहा यांनी आपले मत व्यक्त केले.

कोल्हापूरमधील प्रचार रॅली दरम्यान अमित शहा यांनी असे म्हटले की, महाराष्ट्राच्या जनतेसमोर 2 पर्याय आहेत. त्यामधील एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना महायुती आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि शरद पवार यांची काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आहे. या दोघांच्या दरम्यान महाराष्ट्रातील जनतेला आता विधानसभेवेळी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे.(Amit Shah in Maharashtra: कश्मीर मुद्द्यावर अन्य देशांचा हस्तक्षेप चालवून घेणार नाही- अमित शहा)

तसेच अमित शहा यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक करत पुलवामा मधील दहशतवादाला कसे सडेतोड उत्तर देण्यात आले आणि कशा प्रकारे त्यासाठी प्रयत्न केले या बाबत त्यांनी सांगितले. परंतु यावर राहुल गांधी यांनी नेहमीच टीका केली आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन अमित शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. त्यांनी असे म्हटले की, जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत होती त्यावेळी त्यांनी सिंचन योजनेची घोषणा केली खरी पण त्यासाठी लागणारे 70 हजार कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप लावला आहे. यांच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना सिंचन योजना तर दूरच राहिली पण पाणी सुद्धा मिळाले नाही. सर्व पैसे भ्रष्टाचारी नेत्यांनी लुबाडले असल्याची टीका अमित शहा यांनी प्रचाररॅली वेळी केली.