Amit Shah in Maharashtra: कश्मीर मुद्द्यावर अन्य देशांचा हस्तक्षेप चालवून घेणार नाही- अमित शहा
BJP National President Amit Shah | (Photo courtesy: Facebook)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) बुलढाणा (Buldhana) मधील चिखली येथे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी अमित शहा यांनी आयोजित केलेल्या सभेला संबोधित करत असे म्हटले की, आम्हाला राजकरणापेक्षा भारताच्या भविष्याची चिंता अधिक सतावत आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारने राज्यात गेल्या 15 वर्षाच लूट माजवली आहे. भ्रष्टाचार हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संस्कार आहे. एवढेच नाही काँग्रेसने विदर्भात ही अन्याय केला असून आता भाजप येथील स्थानिकांना न्याय मिळवून देत त्यांचा विकास करणार असल्याचे अमित शहा यांनी सभेवेळी म्हटले आहे. एवढेच नाही कलम 370 हटवल्यानंतर महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग व्हावा अशी नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे कश्मीरच्या मुद्द्यावर अन्य कोणत्याही देशाचा हस्तक्षेप चालवून घेतला जाणार नसल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.

गेल्या 70 वर्षांपासून दहशतवादाखाली जगणाऱ्या हजारो कश्मीरी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नेहमीच कलम 370 हटवण्याचा विरोध केला. परंतु भाजपने कश्मीर मधून कलम 770 अखेट हटवलाच. काँग्रेसचे नेता गुलाम नबी आजाद म्हणायचे की, 370 हटवल्यानंतर कश्मीरमध्ये रक्तपात होईल पण तसे काही झालेच नाही.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: PwD App च्या मदतीने दिव्यांग मतदार घरबसल्या करू शकतील मतदार नोंदणी ते व्हिलचेअरसाठी विनंती)

288 जागांवर राज्यभर 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबर दिवशी या मतदानाची मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने अधिसूचनेद्वारा महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबर दिवशी राज्यभरातील सार्‍या मतदारसंघांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार राज्य आणि केंद्र सरकारची सारी कार्यालयं, निमशासकीय कार्यालयं, महामंडळांची ऑफिसं, सार्वजनिक उपक्रम, बॅंका कामकाजासाठी बंद राहणार आहेत.