Maharashtra Assembly Election 2019: पेट्रोल पंप आणि रेल्वे स्टेशन्ससह सार्वजनिक ठिकाणांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर हटविण्याचे पुण्याच्या उप जिल्हाधिकारी सुरेखा माने यांचे आदेश
PM Narendra Modi (Photo Credits-ANI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या उप जिल्हाधिकारी सुरेखा माने (Surekha Mane) यांनी पुण्यातील पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकारी जाहिरातीचे पोस्टर्स हटविण्याची नोटिस बजावली आहे. लवकरात लवकर या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल असेही त्यांनी सांगितले. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील बस स्थानकांप्रमाणे रेल्वे स्थानक, पेट्रोल पंप यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे पोस्टर झळकत आहे. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 ची आचारसंहिता लागू झाल्याने हे पोस्टर्स ताबडतोब हटविण्यात यावे असे आदेशन पुणे उप जिल्हाधिकारी सुरेखा माने यांनी दिले आहेत. हे पोस्टर्स म्हणजे निवडणुक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 तारीख जाहीर होताच त्याच क्षणापासून सर्वत्र महाराष्ट्रभर आचारसंहिता लागू झाली. मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सुनील अरोडा यांनी निवडणूकांच्या धामधुमीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सावधानता बाळगली पाहिजे. त्यासाठी पुढील नियमांचे कटाक्षाने पाळले गेले पाहिजे असे सुनिल अरोडा यांनी सांगितले आहे.

निवडणूक आयोग अचारसंहिता

 1. उमेदवारांना अर्ज दाखल करताना निवडणूक अर्जातील कोणताही रखाना रिकामा सोडता येणार नाही
 2.  निवडणूक अर्जातील रखाना रिकामा सोडल्यास उमेदवारी रद्द होणार
 3. उमेदवारांना आपले गुन्हे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार
 4. निवडणूक प्रचारात पर्यावरणपूर्क प्रचारसाहित्यालाच प्राधान्य द्यावे लागणार.
 5. प्लास्टिकचा वापर कटाक्षाणे टाळावा लागणार.
 6. निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी निरिक्षकांची नियुक्ती केली जाणार
 7. उमेदवारांना निवडणूक खर्चाचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला द्यावा लागणार
 8. पाचही बुथवरील VVPAT मतमोजणी होणार
 9. VVPAT बुथसाठी केल्या जाणाऱ्या बुथची निवड रँडमली केली जाणार.
 10. पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी भरारी पथकं

  हेही वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Date: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ‌तारीख जाहीर; 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात होणार मतदान; 24 ऑक्टोबरला मतमोजणी

  दरम्यान, महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार निवडणूक प्रक्रियेत मतदान करतील.

  महाराष्ट्रात288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडेल.