राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची नुकतीच पुरंदर (Purandar) येथे प्रचारसभा पार पडली आहे. या सभेत अजित पवार यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काही दिवसपूर्वी शिवसेनेने (Shiv Sena) त्यांच्या पक्षाचा वचननामा जाहीर केला होता. त्यानंतर अनेक राजकीय पक्षाने शिवसेनेवर निशाणा साधला होता. शिवसेना पक्षाने गेल्या निवडणुकीत १ रुपयात आरोग्य तपासणी करु असे अश्वासन दिले होते. पाच वर्षांपूर्वी अशीच खोटी आश्वासने देऊन मते मागितली होती. एकही शब्द त्यांनी पाळला नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. त्याचबरोबर येत्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते संजय जगताप यांना निवडून देऊन माझ्यासोबत विधानसभेत पाठवा, असे अवाहनही अजित पवार यांनी सासवड येथील प्रचार सभेत केले आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृतानुसार, सातारा येथे शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भर पावसात सभा गाजवली होती. पाऊस असतानाही या सभेत मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यामुळे येत्या निवडणुकीत आपल्या बाजूने निर्णय लागेल, असा अंदाज अजित पवार यांनी लावला आहे. "लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्याने जगतापांना निवडून आणायचे आहे. पावसामधील सभेला होणारी गर्दी पाहून प्रतिस्पर्ध्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना काय करायच ते करुद्या. परंतु आपण गाफिल रहायचे नाही. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री विजय शिवतारे यांच्यावर नाव न घेता अजित पवार यांनी तोफ डागली आहे. ज्या लोकांना राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले, आज तेच पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीला मिटवण्याची भाषा करत आहेत, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. हे देखील वाचा- अहमदनगर: अमित शहा यांच्या सभेला पावसाचा फटका; कर्जत- जामखेड येथील सभा रद्द
दरम्यान, अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत म्हणाले आहेत की, "बेट्या तुझी काय औकात आहे? तुझ्या १० पिढ्या यायला पाहिजेत राष्ट्रवादी संपवायला. तू कुणाशी पंगा घेतो. तुझी सगळी अंडी पिल मला माहित आहेत", अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता शिवतारे यांच्यावर तोफ डागली. या मतदार संघात शिवसेनाचा उमेदवार आहे. त्यामुळे भाजपवर काही बोलत नाही, असे ते म्हणाले.