Exam Result | (File Image)

Arogya Vibhag Bharti 2021 Result Out: महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्य विभगाकडून यंदा कोरोना संकटाच्या वर्षपूर्तीनंतर एक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 28 फेब्रुवारी 2021 दिवशी झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेमधील लेखी परीक्षेचा आता निकाल जाहीर झाला आहे. आरोग्य विभागाकडून 10 पदांचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान यामध्ये अवैद्यकीय सहायक, प्रयोगशाळा सहायक, गृहवस्त्रपाल, वस्त्रपाल अशा विविध पदांनुसार निकाल mahaarogyabharti.com या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. इच्छूक उमेदवार या त्यांनी ज्या पदांसाठी परीक्षा दिली आहे त्यासाठी आपला निकाल तपासू शकतात. दरम्यान ही 'क' वर्गातील नोकरभरती आहे. (नक्की वाचा: Maharashtra Government Jobs 2021: सरकारी नोकरीची संधी! महाराष्ट्र आरोग्य विभागात 3139 पदांची मेगाभरती).

कसा पहाल आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षेचा निकाल?

निकाल पाहण्यासाठी mahaarogyabharti.com ला भेट द्या.

होमपेजवर ग्रुप सी च्या परीक्षांच्या निकालांची एक लिंक दिसेल.

त्यावर क्लिक केल्यानंतर नव्या विंडोवर पदांनुसार निकाल पहायला मिळतील.

निकालांमध्ये पदावर क्लिक करा.

रोल नंबर नुसार निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे Ctrl+F क्लिक करून तुमचा रोलनंबर टाका आणि मार्क्स पहा.

दरम्यान या आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेच्या आन्सर की देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील पदं येत्या 2 महिन्यात भरण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काही दिवसांपूर्वी दिले आहे. आरोग्य विभागातील ‘ड’ वर्गातील पदभरती ही थेट भरतीच्या माध्यमातून होणार आहे तर‘क’ वर्गातील 50 टक्के पदे भरली सध्या सुरू आहे. तर मराठा आरक्षणाचा निर्णय आल्यानंतर उर्वरित पदे भरली जाणार आहे असे देखील आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.