Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र वैद्यकिय कर्मचारी उपचार करत आहेत. त्याचप्रमाणे पोलीस दलातील कर्मचारी ही आपले कर्तव्य बजावत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्रातील पोलीस दलातील 557 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे.

राज्यात आतापर्यंत 2,26236 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर 653 जणांनी क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. राज्य सरकारकडून 4729 रिलिफ कॅम्प चालविले जात असून त्यात 4,28,734 स्थलांतरित कामगारांना अन्न आणि अत्यावश्यक सेवा पुरविल्या जात आहेत. तसेच बेकायदेशीर पद्धतीने वाहतूक केल्याची 1286 प्रकरणे समोर आली आहेत. राज्य सरकारने लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे असे वारंवार सांगितले आहे. कलम 188 अंतर्गत 98,774 गुन्हे दाखल करण्यात आले असून 19,082 जणांना अटक केली आहे, त्याचसोबत 54,148 वाहने जप्त केली असून 3,66,31,794 रुपयांच्या दंडाची वसूली केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 11394 वर पोहचला आहे.(Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची काय आहे जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर)

दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून  आले आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार झाला आहे. राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार विविध राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहत लॉकडाउनचे नियम अंशत: शिथील करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने दारुची दुकाने कन्टेंटमेंट झोन वगळता सर्वत्र सुरु करण्यात आली होती. परंतु नागरिकांनी होणारी गर्दी पाहता दारुची दुकाने पुन्हा बंद करण्यात आली आहेत.