Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

जगभरात मृत्यूचे तांडव सुरु केलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या महाराष्ट्रातही झपाट्याने वाढत चालली आहे. महाराष्ट्रात सद्य स्थितीत 17,974 कोरोना बाधित रुग्ण असून एकूण 694 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. तसेच काल दिवसभरात 1216 नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यासोबत 207 नवे रुग्ण बरे झाले असून राज्यात आतापर्यंत 3301 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन चे पालन करण्यात यावे यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासकीय, वैद्यकिय यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत.

मुंबई-ठाण्यात आतापर्यंत एकूण 13,717 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर धारावी परिसरात काल एकूण 50 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळळे असून या परिसरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 783 वर पोहोचली आहे. Coronavirus in India: भारतात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 56,342 वर, पाहा राज्यनिहाय आकडेवारी

कोविड-१९ महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती 

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 11,394 437
2 ठाणे 93 2
3 ठाणे मनपा 650 8
4 नवी मुंबई मनपा 659 4
5 कल्याण डोंबिवली मनपा 263 3
6 उल्हासनगर मनपा 14 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 21 2
8 मीरा भाईंदर 189 2
9 पालघर 46 2
10 वसई विरार मनपा 187 9
11 रायगड 76 1
12 पनवेल मनपा 125 2
ठाणे मंडळ एकूण 13717 472
1 नाशिक 47 0
2 नाशिक मनपा 54 0
3 मालेगाव मनपा 432 12
4 अहमदनगर 44 2
5 अहमदनगर मनपा 9 0
6 धुळे 8 2
7 धुळे मनपा 24 1
8 जळगाव 64 11
9 जळगाव मनपा 14 2
10 नंदुरबार 19 1
नाशिक मंडळ एकूण 715 31
1 पुणे 105 4
2 पुणे मनपा 1899 122
3 पिंप्री-चिंचवड मनपा 125 3
4 सोलापूर 6 0
5 सोलापूर मनपा 177 10
6 सातारा 94 2
पुणे मंडळ एकुण 2406 141
1 कोल्हापूर 10 1
2 कोल्हापूर मनपा 6 0
3 सांगली 32 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 3 1
5 सिंधुदुर्ग 4 0
6 रत्नागिरी 16 1
कोल्हापूर मंडळ एकुण 71 3
1 औरंगाबाद 3 0
2 औरंगाबाद मनपा 397 12
3 जालना 8 0
4 हिंगोली 58 0
5 परभणी 1 1
6 परभणी मनपा 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 468 13
1 लातूर 25 1
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
4 बीड 1 0
5 नांदेड 3 0
6 नांदेड मनपा 29 2
लातूर मंडळ एकूण 61 3
1 अकोला 9 1
2 अकोला मनपा 90 9
3 अमरावती 4 1
4 अमवरावती मनपा 69 9
5 यवतमाळ 93 0
6 बुलढाणा 24 1
7 वाशीम 1 0
अकोला मंडळ एकूण 290 21
1 नागपूर 2 0
2 नागपूर मनपा 204 2
3 वर्धा 0 0
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 1 0
7 चंद्रपूर मनपा 3 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 212 2
1 इतर राज्य 34 8
एकूण 17974 694

सद्य स्थितीत भारतात एकूण 56,342 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून मृतांची एकूण संख्या 1886 वर पोहोचली आहे. ही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 17 मे लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.