मुंबई: विजय सिंह नामक व्यक्तिचा तुरुंगात मृत्यू; वडाळा टीटी पोलीस स्टेशनमधील 5 अधिकारी निलंबीत
Representational Image | (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai)  येथे एका पोलिस ठाण्यात आरोपीचा मृत्यू (Custodial Death)  झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विजय सिंह (Vijay Singh) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. विजय सिंह याला काही दिवसांपूर्वी वडाळा (Wadala) पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, 27 ऑक्टोबर रोजी विजय सिंह याचा रात्री उशीरा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटनेला स्थानिक पोलीस जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे टी टी पोलिस स्थानकातील 5 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. संबधित पोलिसांनी विजय सिंहला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा संशय विजय सिंह यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

एएनआयचे ट्विट-