Mahad, Raigad Landslide: तळीये गावातील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं मिळणार- नारायण राणे
Narayan Rane | (Photo Credits: Facebook)

महाड दरड दुर्घटनेमुळे (Mahad Landslide) सध्या संपूर्ण राज्य दु:खाच्या छायेखाली आहे. यात दुर्घटनेत तळीये गाव उद्धस्त होऊन 44 जणांना मृत्यू झाला आहे. या दुर्घटनाग्रस्त भागाची आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पाहाणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) उपस्थित होते.  यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी तळीये गावातील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं बांधून देण्यात येतील, अशी घोषणा केली. तसंच स्थानिक नागरिक सांगितलं तिथेच पुनर्वसन करण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले.

दुर्घटनाग्रस्तांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे. मृत्यू झालेल्यांना परत आणता येणार नाही, ही दुर्दैवी बाब आहे. मात्र जे आहेत त्यांना चांगल्या प्रकार दिलासा देता येईल, असेही ते यावेळी म्हणाले. (Mahad, Raigad Landslide: दरड कोसळून उद्धवस्त झालेलं तळीये गाव म्हाडा वसवणार; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा)

Narayan Rane Tweet:

स्थानिकांच्या मदतीसाठी अधिकारी, एनडीआरएफची पथकं चांगली कामं करत असून गावातच कायमच पुनर्वसन करावं अशी सरपंचांची मागणी असल्याचंही नारायण राणे यावेळी बोलले. दरम्यान, आज नारायण राणे यांनी चिपळूण, खेड या पूरग्रस्त भागांचीही पाहाणी केली.