Balasaheb Thorat | ( File Edited Image Used For Representational purpose Only)

केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षांना मिळत असलेली वागणूक. विरोधकांची होणारी मुस्कटदाबी यांवरुन महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) आक्रमक झाली आहे. महाविकासआघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात विधान भवन आवारात तोंडाला काळ्या पट्टा लावून आंदोलन केले. सत्ताधारी आमदारांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते. याचा निषेध करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat Warns Government) यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. इतकेच नव्हे तर 'आमच्याकडेही पायताने आहेत हे विसरु नका' असा सज्जड इशारात सत्ताधाऱ्यांना दिला. ते विधान भवन परिसरातून महाविकासआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

सत्ताधारी आमदारांकडून विधान भवन परिसरात आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अवहेलनात्मक भाषा आणि कृती सुरु होती. सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे राष्ट्रीय नेते त्यांच्याकडेही आहेत आणि पायताणं आमच्याकडेही आहेत, हे विसरुन चालणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता विधानसभा अध्यक्षांनी तातडीने या आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. (हेही वाचा, Modi Means Corruption: 'मोदी म्हणजे भ्रष्टाचार!' भाजप नेत्या खुशबू सुंदर ट्विट व्हायरल; राहुल यांच्या लोकसभा अपात्रतेचीही जोरदार चर्चा)

ट्विट

चुकीचे वर्तन करणाऱ्या दोन्ही बाजूच्या (सत्ताधारी आणि विरोधक) दोन्ही सदस्यांवर कारवाई करा. आमचे म्हणने नाही की कोणा एकावरच कारवाई करा. पण, विधान भवन परिसरात चुकीचा पायंडा पडू नये. हे कृत्य कुठेतरी थांबले पाहिजे असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. विधानसभाअध्यक्षांकडे आम्ही कारवाईची मागणी केली होती. आमचा तसा आग्रह होता. मात्र, आतापर्यंत तरी अध्यक्षांनी तशी कोणतीही कारवाई केली नाही. तो अध्यक्षांचा अधिकार आहे. पण तो अधिकार वापरण्यास अध्यक्ष टाळाटाळ करत असल्याचेही थोरात यावेळी म्हणाले.