Maharashtra TET 2021 Revised Exam Date: शिक्षक पात्रता परीक्षा आता 31 ऑक्टोबरला; 14 ऑक्टोबरला जारी होणार हॉल तिकीट
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Youtube)

महाराष्ट्र स्टेट काऊंसिल ऑफ एक्झामिनेशन (Maharashtra State Council of Examination) कडून यंदा  शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2021 Exam( 31 ऑक्टोबरला घेतली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यापूर्वी ही परीक्षा 10 ऑक्टोबरला होणार होती. मात्र याच दिवशी युपीएससी आयएएस 2021 परीक्षेची एंटरन्स परीक्षा असल्याने आता परीक्षा तारखेमध्ये बदल करण्याचा निर्णय झाला आहे. ऑफिशिएअल नोटीस प्रसिद्ध करत परीक्षेची बदललेली तारीख अअणि 14 ऑक्टोबर पासून अ‍ॅडमीट कार्ड्स (Admit Cards) जारी केली जातील असं आता जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे उमेदवारांना 14 ऑक्टोबरपासून 31 ऑक्टोबर पर्यंत त्यांची हॉलतिकीट्स डाऊनलोड करता येणार आहे.

शिक्षक पात्रता परिक्षा द्वारा निवडले गेलेले उमेदवार शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पात्र ठरवले जातात. त्यासाठी दरवर्षी MSCE परीक्षा घेते. या परीक्षेमध्ये दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यांत (primary level) मध्ये एक पेपर असतो. त्याच्या द्वारा पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवता येऊ शकते.तर दुसरा पेपर हा अप्पर प्रिलिमरी लेव्हल साठी असतो. पेपर 1 दिलास पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवता येऊ शकतं. पेपर 2 दिल्यास सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवता येते. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं असल्यास दोन्ही पेपर द्यावे लागतात.

MAHA TET 2021 exam ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी, मराठी, हिंदी, बंगाली, उर्दू, गुजराती, तेलगू, सिंधी आणि कन्नड भाषेत घेतली जाते.नक्की वाचा: CTET Exam 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या परीक्षेची तारीख.

जे उमेदवार ही परीक्षा क्वालिफाय करतात त्यांना MAHA TET pass certificate दिलं जातं. त्याच्या द्वारा विविध शाळांमध्ये शिक्षक पदासाठी अर्ज करु शकतात.