कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे घ्याव्या लागलेल्या लॉकडाऊन निर्णयाचा भारतासह जगभारातील अर्थ्यव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रही यात आलाच. या घसरलेल्या अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकार अनेक प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचाच भाग म्हणून राज्य सरकार मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 (Magnetic Maharashtra 2.0) च्या माध्यमातून राज्याच्या उद्योग धोरणात आमूलाग्र बदल घडवून आणू पाहात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात 16 हजार कोटींचे करार झाले आहेत. तर आणखी महिन्याभरात 8 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होऊ शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे कोरनाचा कहर जगभरात आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही. देशातील विविध राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात काहीसा अधिक. असे असले तरी जगभरातील उद्योजकांनी अशा स्थितीतही गुंतवणूक करण्यास महाराष्ट्रालाच अधिक प्राधान्य दिले आहे. भारतासह जगभरातील 16 हजार कोटींच्या गुंतवणूकीसाठी सुमारे एक डझनाहून अधिक कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. (हेही वाचा, जुलै 2017 ते जानेवारी 2020 पर्यंत GSTR-3B रिटर्न फाइल केल्यास शुल्क लागणार नाही- अर्थमंत्री निर्मला सीतारमण)
सामंजस्य करार झालेल्या कंपन्या आणि गुंतवणूक रक्कम पुढीलप्रमाणे
|
|||
अं.न. | कंपनीचे नाव | जिल्हा | गुंतवणूक रक्कम |
1. | एक्सॉन मोबिल(अमेरिका)ऑइल अँड गॅस- इसाम्बे, | रायगड | 760 कोटी |
2. | हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक-2 | पुणे | 250 कोटी (150 रोजगार)
|
3. | असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक | चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे | 560 कोटी
|
4. | वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया | सुपा, अहमदनगर | 820 कोटी |
5. | हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक | भिवंडी- चाकण तळेगाव | 150 कोटी (2500 रोजगार) |
6. | असेट्ज (सिंगापूर)डेटा सेंटर | टीटीसी, ठाणे- महापे | 1100 कोटी (200 रोजगार)
|
7. | इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन | रांजणगाव, पुणे | 120 कोटी (1100 रोजगार) |
8. | पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो | तळेगाव | 1000 कोटी (रोजगार 1500)
|
9. | इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक | रायगड
|
1500 कोटी (रोजगार 2500) |
10. | रॅकबँक(सिंगापूर) डेटा सेंटर | ठाणे, हिंजेवाडी, पुणे
|
1500 कोटी |
11. | युपीएल( भारत) केमिकल- | शहापूर, रायगड | 5000 कोटी (रोजगार 3000) |
12. | ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल | तळेगाव- पुणे | 3770 कोटी (रोजगार 2042)
|
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आदिती तटकरे उपस्थित होत्या. डिजिटल माध्यमातून पार पडलेल्या या कार्यक्रमास विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार, उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या लहान, मोठ्या उद्योजकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.