
स्टँड-अप कॉमेडियन ( Stand-Up Comedy) कुणाल कामरा (Kunal Kamra) यास मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) अंतरिम अटकपूर्व जामीन शुक्रवारी (28 मार्च) मंजूर केला. मुंबई येथे चित्रित झालेल्या आणि युट्युब या मंचावरुन प्रसारित झालेल्या कॉमेडी शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्याबद्दल कामरा यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत आहे. शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कामरा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यास चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्सही बजावण्यात आले आहे. दरम्यान, त्याने अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता.
अटकेची भीती? कोर्टात धाव?
वय वर्षे 36 असलेल्या कुनाल कामरा याने, अटकपूर्व जामीन मागताना मद्रास उच्च न्यायालयात माहिती दिली की, तो 2021 मध्ये मुंबई येथून तामिळनाला स्थलांतरित झाला आहे आणि तेव्हापासून ते तिथेच राहत आहे. मुंबई पोलिसांकडून होणाऱ्या कथीत अटकेबद्दल चिंता वाटत असल्याने आपण अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करत असल्याचेही कामरा यानने कोर्टात म्हटल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. (हेही वाचा, Kunal Kamra Releases Another Video: 'साडीवाली दीदी' उल्लेख करत कुणाल कामराचा निर्मला सीतारमण आणि मोदी सरकारवर निशाणा, नवीन व्हिडिओ केला शेअर)
शिंदे समर्थकांकडून तोडफोड
मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये एकनाथ शिंदे यांना कथीतररित्या लक्ष्य करून केलेल्या विडंबनात्मक सादरीकरणानंतर मुंबई पोलिसांनी या विनोदी कलाकाराला आधीच दोनदा समन्स बजावले आहे. या कृत्यामुळे शिवसेना समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला, ज्यामुळे क्लब आणि ज्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला तेथे तोडफोड करण्यात आली. (हेही वाचा, Mumbai Police Issue Notice to Kunal Kamra: कुणाल कामरा विरुद्ध एफआयआर, मुंबई पोलिसांकडून नोटीस जारी; गाण्यातील 'गद्दार' शब्दावरुन वाद)
कामरा विरुद्ध तक्रार, समन्स जारी
शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर, खार पोलिसांनी उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली कामरा यांच्यावर गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिसांनी दुसरे समन्स गुरुवारी जारी केले आणि कामरा यास या प्रकरणासंदर्भात 31 मार्च रोजी त्यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले. (हेही वाचा, Kunal Kamra Eknath Shinde Controversy: कुणाल कामरा याने कोणाचाही अपमान करू नये: रामदास आठवले)
कमरा ज्या स्टुडीओमध्ये कार्यक्रम सादर करत होते त्या हॉटेलमध्ये कॉमेडी क्लबची तोडफोड आणि मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी पक्षाचे नेते राहूल कनाल यांच्यासह 12 शिवसेना कार्यकर्त्यांना अटक केली आहे. ज्यांना आता जामीनही मिळाला आहे.
दरम्यान, एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर कडक शब्दात केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, कामरा यांनी मुख्य प्रवाहातील माध्यमांवर टीका केली आणि त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला. 'सध्याच्या काळात मुख्य प्रवाहातील माध्यमे ही सत्ताधारी पक्षाची चुकीची माहिती देणारी शाखा आहे. ते गिधाडे आहेत, जे अशा मुद्द्यांवर वृत्तांकन करतात जे या देशातील जनतेसाठी महत्त्वाचे नाहीत. जर त्यांनी उद्यापासून अनंतकाळपर्यंत आपले काम बंद ठेवले तर ते देशावर, त्याच्या लोकांवर आणि त्यांच्या स्वतःच्या मुलांवर उपकार करतील, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. दरम्यान, कामराची कायदेशीर लढाई तीव्र होत असताना, 31 मार्च रोजी पोलिसांच्या समन्सवर आणि प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.