BJP | Twitter

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही वर्षात अनेक वळणं आली आहेत. कालच राज्यसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्यात आले. यामध्ये भाजपच्या अनेक जुन्या, जाणत्या नेत्यांची नावं चर्चेमध्ये होती पण कॉंग्रेस मधून आलेल्या अशोक चव्हाणांना उमेदवारी जाहीर झाल्याने पुन्हा पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचं काय? असा सवाल उपस्थित झाला होता. पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची नावं चर्चेत असताना अशोक चव्हाणांसोबत मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली. यावरून ज्येष्ठ भाजपा नेते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांच्या लेकानेही मनातील भावना एका पोस्ट द्वारा व्यक्त केल्या आहे. आपल्या वडिलांच्या 50 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये 12 वेळा विधिमंडळ, राज्यसभेसाठी नाव चर्चेमध्ये आलं पण त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नसल्याची खदखद बोलून दाखवली आहे.

भाजपा मध्ये काम करताना माधव भंडारी यांनी कधीच स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा वापर केला नाही. लोकांसाठी, पक्षांसाठी स्वतःला वाहून घेतलं. आपल्या आजारपणात, पत्नीच्या निधनानंतरही त्यांनी पक्षासाठीचं काम सुरूच ठेवलं पण त्यांना अपेक्षित फळ मिळालं नसल्याचं चिन्मय भंडारी यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपण पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उभं करत आहोत असे नाही पण अनेक भाजप नेत्यांनी लहानसहान गोष्टी न मिळाल्यानेही नाराजी व्यक्त केल्याची म्हटलं आहे. Rajya Sabha Election 2024: भाजपा कडून Ashok Chavan, Medha Kulkarni, Dr Ajeet Gopchade यांना महाराष्ट्रात राज्यसभेची उमेदवारी जाहीर .

पहा चिन्मय भंडारी यांची पोस्ट

महाराष्ट्रात 6 राज्यसभा जागांसाठी भाजपा कडून 3 जागी उमेदवार देण्यात आले. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी देखील पक्षाकडून तयारी केली जात आहे. पण या पार्शवभूमीवर भाजपा मध्ये 'आयाराम कल्चर' वाढत असल्याची चर्चा आहे. विरोधकांकडूनही यावरून टीका होत आहे.