Madha Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे संजय शिंदे (Sanjay Shinde) आणि भाजप (BJP) उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar)तर, वंचित बहुजन आघाडी (VBH) तर्फे विजय मोहे अशी प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawa) यांच्या उमेदवारीची घोषणा आणि त्यानंतर धक्कादायक माघार यामुळे चर्चेत आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सातारा (Satara) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा मिळून बनलेला हा मतदारसंघ. या मतारसंघातून 2009 ते 2014 या काळात शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केले आहे. तर, त्यानंतर 2014 ते 2019 या काळात विजयसिंह मोहिते पाटील हे येथून विद्यमान खासदार आहेत. मात्र, लोकसभा निडणूक 2019 च्या तोंडावर खा. विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मतदारसंघातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. रणजितसिंह मोहिते पाटील यांना भलेही उमेदवारी मिळाली नाही. परंतू, राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपची ताकद वाढण्यासाठी या मतदारसंघात मात्र मदत झाली. मोहिते पाटील आणि भाजप यांच्यात आयत्या वेळी काहीतरी खेडी होणार. हे ध्यानात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने संजय (मामा) शिंदे यांच्या रुपात भाजप पुरस्करत जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल करुन घेतला आणि त्यांना उमेदवारीही दिली.
दरम्यान, 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस विरोधी लाट असतानाही विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला गढ शाबूत राखला होता. त्यावेळी (2014) विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत असा सामना रंगला होता. या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांना 4 लाख 89 हजार 989 तर विरोधात असलेल्या सदाभाऊ खोत यांना 4 लाख 64 हजार 645 इतकी मते मिळाली होती. काटावरच्या मताधिक्याने (25 हजार 344 मते) विजयसिंह विजयी झाले होते.
दरम्यान, या वेळी सदाभाऊ खेत आणि विजयसिंह मोहिते-पाटील एकाच गोटात आहेत. त्यामुळे राजकीय लढाईला रंगत आली असून, हा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे विरुद्ध भाजपचेच रणजितसिंह नाईक निंबाळकर असा रंगला आहे. मतदारांच्या मनात काय हे प्रत्यक्ष मतमोजणीदिवशीच कळणार आहे.