LPG Cylinder Blast: मीरा रोड येथील अपार्टमेंटमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट, एक गंभीर जखमी
Fire (PC - File Image)

LPG Cylinder Blast:  मीरा भाईंदर येथील रामदेव पार्क परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्दैघटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली, आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (हेही वाचा- नालासोपारा येथील धानिवबाग परिसरातील पार्किंगमध्ये आग (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोडी येथील राम अपार्टमेंटमधील तळमजल्यावर एलपीजीचा स्फोट झाला. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, १६ किलोग्रॅमचे आणखी पाच व्यावसायिक सिलिंडर रुममध्ये सापडले. या दुर्घटनेत संजय कुमार आबादे वय वर्ष १८ असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा स्फोट कसा झाला? याचा शोध अधिकारी घेत आहे. संजय सोबत आणखी एक जण राहत होता. तो सुदैवाने वाचला आहे. त्याला अधिकारी चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

घटनेची माहिती मिळताच, सुमारे २५ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि चार अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वेळीच आग आटोक्यात आणली. स्फोट इतका भीषण होता की, रुममधील सर्व वस्तूचे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुममध्ये आणखी असलेले सिलिंडर जप्त केले आहे.