लोणावळा: चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराकडून 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या
Representational Image (Photo Credits: Facebook)

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराने एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना लोळावणा (Lonavala) परिसरात घडली आहे. स्थानिक पोलिसांना या संदर्भात माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरुवात केली. दरम्यान, घरातील वस्तू आणि इतर गोष्टी सर्वत्र घरात पसरल्या होत्या. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहे. तसेच खूनी जवळचा असू शकतो, असा अंदाज पोलीसांकडून वर्तवण्यात आला आहे. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे लोणावळा शहर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत, असे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे.

रेश्मा पुरुषोत्तम बंसल (वय 70) असे मृत महिलेचे नाव आहे. रेश्मा या आपल्या पतीसोबत मागील अनेक वर्षांपासून लोणावळ्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या द्वारकामाई सोसायटीमध्ये राहत आहे. रेश्मा यांचे एक दुकान असून त्या दररोज आपल्या पतीला डबा देण्यासाठी तिथे जात असे. परंतु, रेश्मा या आज डबा घेऊन दुकानावर गेल्या नाहीत. यामुळे त्यांचे पती पुरुषोत्तम हे घरी जेवण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी पाहिले की, रेश्मा ही घरातील पॅसेजजवळ वेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. त्यानंतर पुरुषोत्तम यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने रेश्मा यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी रेश्मा यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले. यामुळे पुरुषोत्तम यांच्यावर दुख:चे डोंगर कोसळले. हे देखील वाचा- घाटकोपर: आगोदर सापडले महिलेचे धड मग पाय, मुंबई पोलीस बेवारस मृतदेहाच्या शिराच्या शोधात

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराची पाहणी केली असता घरातील साहित्य इतरत्र पसरलेले आढळून आले. तसेच मौल्यवान दागिने चोरीला गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने वयोवृद्ध महिलेचा खून झाला असल्याबाबतची तक्रार दाखल केली आहे.