कांदा (Photo Credit : ThoughtCo)

ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत. त्यामुळे कांद्याच्या वाढलेल्या भावाने ग्राहकांना रडवले आहे. मात्र पुण्यात कांदा भरुन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. या अपघातामुळे ट्रक चालकाला दुखापत झाली. त्याचबरोबर ट्रकमधील कांदा रस्त्यावर पसरला गेला. मात्र लोकांनी चालकाचा जीव वाचवण्याऐवजी कांदा लुटल्याचा विचित्र प्रकार या अपघातानंतर घडला आहे.

पुणे- मुंबई हायवेवर ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये ट्रकमध्ये असलेला कांदा रस्त्यावर पडून तो लोकांनी अक्षरश: लुटला. तसेच काहींनी तर चक्क पोती भरुन या ऐन दिवाळीत कांद्याची सोय व्हावी म्हणून असे केले असावे.मात्र या अपघातातील गंभीर बाब म्हणजे ट्रक चालक जखमी झाल्याचे बाजूला राहिल्याचे दिसून आले. तर लोकांनी त्या चालकाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यापेक्षा कांदा लुटताना दिसल्याचा प्रकार घडला आहे.