Lonavala Covid19 Guidelines: न्यू इयरला लोणावळ्यात जाण्याचा प्लान करत आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी
Mask | Representative Image (Photo Credits: Pixabay)

देशात पुन्हा एकदा कोव्हिड१९ चा धोका दरवाजा ठोठावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या सुचना जारी करण्यात आल्या आहेत. पण इयर एण्ड आणि नाताळाच्या सुट्ट्याच्या पार्शवभुमिवर राज्यभरात पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सगळ्याचं पर्यटन स्थळ, देवदर्शन, रिसोर्टस, अभयारण्य अशा जागी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. तरी मुंबई किंवा पुणेकरांसाठी शॉर्ट ट्रीप किंवा छोटा विसावा म्हणजे लोणावळा. प्रत्येक विकेंडला मुंबईसह पुण्यातून मोठ्या संख्येने कुटुंबासह मित्रपरिवारासोबत लोणावळ्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. तरी आता नाताळ आणि न्यू इयरच्या निमित्ताने लोणावळ्यातील अनेक रिसॉर्टची बुकींग हाऊस फुल झाली आहे. तरी तुम्ही देखील नवीन वर्षाचा मुहूर्त साधत लोणावळ्यात जाण्याचा प्लान केला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

 

देशभरात कोरोनाच्या नव्या लाटेला आळा बसण्यासाठी कोव्हीड विरोधक काही विशेष गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. तरी लोणावळ्यातही मास्क, सॅनिटाईजर आणि सोशल डिस्टनसिंग राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. म्हणजेचं लोणावळ्यात मास्क बंधनकारक नसला तरी मास्क लावा असा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच हॉटेल, लॉजिंग आणि रिसॉर्टमालकांना या उपाययोजना राबवण्याचं आवाहन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केले आहे. (हे ही वाचा:- Mask Is Mandatory In Temple: महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती! राज्यातील ‘या’ प्रमुख मंदिरात मास्कचा वापर बंधनकारक)

 

लोणावळ्यामध्ये ख्रिसमस आणि 31 डिसेंबरसाठी मोठ्या प्रमाणात पर्ययटकांची ये-जा असते. त्या सर्व पर्यटकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचं पालन करावं. लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात लॉज, रिसॉर्ट आणि हॉटेल्स आहेत. अनेक पर्यटक याच ठिकाणी सेलिब्रेशनसाठी येत असतात. त्यामुळे नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या हॉटेल मालकांना पत्र देण्यात येणार आहे. त्या पत्रामार्फत त्यांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येतील. केंद्र शासनाच्या प्रत्येक सूचनांचं पालन या हॉटेल धारकांनी करणं गरजेचं असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.