Loksabha Elections 2019: लातूर येथील सभेतून पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना मोदींचे आवाहन; युतीनंतर नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे प्रथमच एका मंचावर
PM Narendra Modi in Latur Sabha (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणूकीच्या (Loksabha Elections 2019) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. आज लातूर (Latur) येथील आयोजित सभेत शिवसेना-भाजप युतीनंतर पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रथमच एका मंचावर आले. उद्धव ठाकरे यांचा लहान भाऊ असा उल्लेख करत मोदींनी भाषणाला सुरुवात केली. नागरिकांच्या विश्वासाने निरंतर कामाची उमीद दिली असून मोठी कामं आणि संकल्प करण्याचे साहसही तुमच्या विश्वासातूनच मिळते. विश्वास ही माझी 5 वर्षातील सर्वात मोठी कमाई आहे, असे लातूर लोकसभा मतदारसंघातील सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारसभेत मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांची आज 'वर्धा'मधून महायुतीच्या प्रचारसभांना सुरूवात; सभेपूर्वी खास मराठी भाषेत ट्विट

पुढे ते म्हणाले की, नक्षलवादमुक्त देश आणि आदिवासी बांधवांना सर्व सुविधा पुरवण्याचा आमचा संकल्प आहे. देश सुरक्षित हातात आहे का?, चौकीदारवर विश्वास आहे का? असा सवालही त्यांनी सभेतील उपस्थित नागरिकांना विचारला. काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला होता, याचीही आठवण मोदींनी करुन दिली. काश्मीर भारतापासून वेगळा करु इच्छिणाऱ्यांना शरद पवार साथ देत आहेत, असेही मोदी म्हणाले.

देशातील लहान दुकानदारांनाही पेन्शन मिळणार. तसंच दीड कोटी गरीबांना हक्काची घरं दिली असून 2022 पर्यंत सर्वांना पक्कं हक्काचं घर देणं हे आमचं लक्ष्य असल्याचे मोदींनी सांगितले.  सर्जिकल स्ट्राईक, सवर्णांना आरक्षण अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आम्ही 2014 च्या जाहीरनाम्यात उल्लेख केला नव्हता. तरी आम्ही ती कामं प्रामाणिकपणे केली. तसंच नवमतदारांनाही तुमचं देशासाठी, सैनिकांसाठी, शहीदांसाठी द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

ANI ट्विट:

BJP ट्विट:

राममंदीर, काश्मीरचं कलम, शेतकऱ्यांना प्राधान्य या जाहीरनाम्यातील बाबींमुळेच शिवसेना-भाजपची युती झाली. राहुल गांधींची गरीबी हटली पण देशातील नागरिकांची कधी हटणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत उपस्थित केला. तसंच राज्य सरकारला तुमचा आशीर्वाद अधिक मजबूतीने द्या, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केली.

मोदींच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटले की, "ही गल्लीतील नाही तर दिल्लीतील निवडणूक आहे. ही देशाची अस्मितेची निवडणूक आहे. आपण सर्वांनी मिळून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या पक्षांना भूईसपाट करू." गेल्या चार पीढ्यांपासून गांधी कुटुंबिय गरीबी हटावोचा नारा देत आहेत. पण गरीबी काही हटली नाही. मग राहुल गांधी काय खाऊन गरीबी हटवणार आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.