Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: Getty Images)

महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणूकीची (Lok Sabha Elections) धूम सुरू झाली आहे. यामध्ये भाजपा- युतीची पहिली सभा महाराष्ट्रामध्ये घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहेत. वर्धामध्ये (Wardha) आज मोदींची पहिली सभा होणार आहे. त्यापूर्वी नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मराठीत एक खास संदेश लिहला आहे. “महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना नमस्कार, आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे”असे मोदींनी ट्विटमध्ये लिहले आहे.  लोकसभा निवडणुक 2019, राम नवमी, महाराष्ट्र दिन आणि मतमोजणी यामुळे मुंबई, पुणे, ठाणे सह महाराष्ट्रात एपिल-मे महिन्यात 5-7 दिवस ड्राय डे; पहा संपूर्ण यादी

नरेंद्र मोदी ट्विट

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये भाजपा-शिवसेना-रिपाई गटाने महायुती केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचार करण्यासाठी मोदी आठ प्रचारसभा घेणार आहेत. यामधील पहिली सभा आज वर्धा येथे आहे. पुढे गोंदिया आणि मुंबईमध्ये मोदी प्रचारसभा घेतील. वर्धा लोकसभा मतदारसंघ: रामदास तडस विरुद्ध चारुलता टोकस सामना रंगणार; भाजप - काँग्रेस संघर्षात कोण मारणार बाजी?

नरेंद्र मोदींचा विश्वास

“केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई(आठवले गट) महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे”, असे ट्विट लिहीत त्यांनी महाराष्ट्रातील जनता महायुतीला पुन्हा विजय मिळवून देईल अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

शनिवारी अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेस उद्धव ठाकरे गांधीनगरला गेले होते. त्यांनी अमित शहांना शुभेच्छा आणि पाठिंबा देत युतीच्या विजयावर विश्वास व्यक्त केला आहे.