Representational Image (Photo Credits: Getty Images)

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) च्या मतदानाचा अंतिम टप्पा आता जवळ आला आहे. चौथ्या आणि अंतिम टप्प्यामध्ये महाराष्ट्रात 29 एप्रिल 2019 दिवशी मतदान होणार आहे. मतदानाचा हक्क(Voting Right) बजावा असं आवाहन विविध माध्यमातून करण्यात आलं आहे. परंतू पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख (Ganesh Deshmukh)यांनी 'मतदान नाही तर पगार नाही' असा आदेश काढल्याचं वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे. मतदानासाठी सरकारने दिलेल्या सुट्टीचा उपयोग वापर मतदानासाठी झालाच पाहिजे असे सांगितले आहे. त्यामुळे मतदान केले नाही तर एक दिवसाचा पगार कापला जाईल असे आदेश त्यांनी दिले आहेत. Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र राज्य सरकार कडून लोकसभा निवडणुक मतदान दिवशी सुट्टी जाहीर; पहा कोणा कोणाला लागू असेल सुट्टी

 

29 एप्रिलला मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पनवेलचा समावेश होतो. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येऊ शकतो. पनवेल महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी आणि कंत्राटी कामगारांनी मतदानाचा हक्क बजावून सुट्टीचा उद्देश पूर्ण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासंबंधी जारी केलेल्या परिपत्रकामध्ये कर्मचार्‍यांना त्यांनी मतदान केल्याची माहिती संबंधित विभागाला द्यायला सांगितली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारप्रमाणे पालिका कर्मचार्‍यांना मतदानाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र मतदान न केल्यास शिस्तभंग केल्यासारखे होईल. त्यामुळे मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल असे गणेश देशमुख यांनी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना सांगितले.