Vanchit Bahujan Aghadi Joins Maha Vikas Agadi: आगामी महत्त्वाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha 2024 Polls) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी (VBA) अधिकृतपणे महाविकास आघाडी (MVA) मध्ये सामील झाली आहे. आंबेडकरांच्या युतीत सामील होण्याच्या अनेक दिवसांच्या अटकळ आणि चर्चांनंतर आता अधिकृतरीत्या ही बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी X वर (पूर्वीचे ट्विटर) ही घोषणा केली. संजय राऊत यांनीही वंचीत बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाल्याची माहिती सामायिक केली आहे.
वंचीत मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे त्यामुळे एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि दलित नेते प्रकश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा विदर्भ प्रदेशासह काही जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे. आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीला अधिकृत निमंत्रणही देण्यात आले होते.
वंचीत बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाला.
ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे 2 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील.
वंचीत मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल.भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल.@Prksh_Ambedkar… pic.twitter.com/BpkyWDvlt9
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 30, 2024
याबाबत केलेल्या घोषणेमध्ये म्हटले आहे, ‘देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. 2024 साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडी ची स्थापना झाली, हे आपण जाणताच.’ (हेही वाचा: Elections For Rajya Sabha Seats: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक; आयोगाने जाहीर केला कार्यक्रम)
यामध्ये पुढे म्हटले आहे, ‘आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे. 30 जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.’