
लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections) चौथ्या टप्प्यातील मतदान आज (29 एप्रिल) पार पडत आहे. तर भिवंडीत (Bhiwandi) ऐन मतदानाच्या वेळी एका तरुणाची धारधार शस्राने हत्या करण्यात आली असल्याची घटना घडली आहे. याबद्दल पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, नेहरुनगर येथील डोंगरीवरील ही घटना आहे. तर पैशांच्या वादातून 30 वर्षीय तरुणाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजिम अयबु सय्यद असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजिम याचा मित्र जलालुद्दीन याने त्याची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. परंतु आरोपीने हत्या केल्यानंतर घटनास्थळापासून पळ काढला आहे.(Jet Airways: जेट एअरवेज सिनिअर टेक्नीशियन शैलेश सिंह यांची आत्महत्या, पालघर येथील नालासोपारा परिसरातील घटना)
निवडणुकीतील पैशांच्या वाटपावरुन हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर पोलिसांनी अजिम याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याचे सांगितले आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासत आहेत.