Voter List (Photo Credits-Facebook)

Lok Sabha Elections 2019: भारतात 18 वय वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावता येतो. तसेच निवडणुक आयोगाकडून मतादानापूर्वी मतदार यादी जाहीर केली जाते. त्यामध्ये व्यक्तीच्या नावासह त्याची ओखळ नमूद केलेली असते. त्यामुळे मतदान करण्यापूर्वी मतदान कार्डासोबत या यादीमध्ये सुद्धा तुमचे नाव आहे की नाही हे तपासून पाहिले जाते. तर यंदा जरी तुमच्याकडे मतदार यादी नसल्यास तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ती पाहता येणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे हे महत्वाचे आहे. परंतु जर तुम्हाला महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदार यादीमधील तुमचे नाव शोधून ही सापडे नाही तर आधी हे काम करा.

(हेही वाचा-मतदान ओळखपत्र हरवलंय? घाबरु नका; कायदेशीर मार्गाने बनवा डुप्लिकेट)

मतदार यादीमधील नाव शोधण्याची सोपी पद्धत:

- सर्वात प्रथम नॅशन सर्व्हिस पोर्टल https://www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. येथे भेट दिल्यावर नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल इलेक्ट्रोल पेज शोधा.

-जर तुमच्याकडे EPIC क्रमांक असल्यास तुम्हाला Search by EPIC Number ऑप्शनवर क्लिक करावे.तसेच जर तुमच्याकडे ईपीआयसी (EPIC) क्रमांक नसल्यास Search by Deatils वर क्लिक करा.

-मतदार यादीमध्ये तुमचे नाव दाखल करण्यासाठी तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. जर तुमचे नाव यादीमध्ये येत असल्यास तुम्ही मतदान करु शकणार आहात.

-मतदार यादीमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला फॉर्म 6 भरावा लागणार आहे.

त्याचसोबत निवडणुक आयोगाने हेल्पलाईन अॅपसुद्धा सुरु केले आहे. या अॅपमधून नागरिकांना मतदान यादीमधील नाव शोधण्यापासून ते नवीन रजिस्ट्रेशनची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच निवडणुकीबद्दल अधिक माहितीसुद्धा या अॅपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.