WR Special Local for Election duty Staff (Photo Credits: PTI / File Photo)

WR Special Trains for Election Duty Staff: महाराष्ट्रामध्ये यंदा चार टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) पार पडणार आहे. चौथा आणि अंतिम टप्पा येत्या 29 एप्रिल 2019 दिवशी पार पडणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूकीचं कामकाज सुरळीत होण्यासाठी कर्मचार्‍यांच्या मदतीला (Election duty Staff) आता पश्चिम रेल्वे (Western Railway) देखील धावून आली आहे. विरार ते डहाणू (Virar to Dahanu Road)दरम्यान 29 आणि 30 एप्रिल दिवशी विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.  महाराष्ट्र दिन आणि मतमोजणी यामुळे मुंबई, पुणे, ठाणे सह महाराष्ट्रात एपिल-मे महिन्यात 5-7 दिवस ड्राय डे; पहा संपूर्ण यादी

कोणत्या वेळेत धावणार ट्रेन ?

विरार ते डहाणू दरम्यान सकाळी आणि रात्री विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. यामध्ये 29 एप्रिल सकाळी मतदानाच्या दिवशी विरार ते डहाणू विशेष लोकल असेल. सकाळी 4.20 वाजता विरारहून सुटणार आहे. तर रात्री डहाणूहून 23.55 वाजता ट्रेन सुटणार आहे. विरारला ही ट्रेन रात्री 1.10 वाजता पोहचणार आहे. मुंबई: चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी महिला मतदारांना दिले जाणार सॅनेटरी पॅड, निवडणुक आयोगाचा निर्णय

पश्चिम रेल्वे ट्विट 

29 एप्रिल दिवशी महाराष्ट्रात 17 लोकसभा मतसंघात मतदान होणार आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. यंदा सामान्य मतदार केंद्रांसोबतच सखी मतदान केंद्र, दिव्यांगासाठी विशेष मतदान केंद्र उभारली जाणार आहेत.