लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर आता मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी निवडणुक आयोगाने (Election Commission) एक नवी अयोजना आखली आहे. त्यामध्ये मुंबईतील (Mumbai) चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी महिला मतदरांना सॅनिटरी पॅड देण्यात येणार असल्याची माहिती टाईम्स नाऊ न्युझने दिली आहे.
29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान मुंबईत पार पडणार आहे. तर प्रथमच निवडणुक आयोगाकडून महिला मतदरांना पॅड देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील सखी मतदान केंद्रांमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिला मतदाराला पॅड देण्यात येणार आहेत. त्यामुळे या योजनेचा मुख्य उद्देश अधिकाधिक महिलांनी मतदान करावे असा आहे. यासाठी मुंबई उपनगरातील कुर्ला,अंधेरी आणि बोरीवली येथे विशेष सखी मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. तेथे फक्त महिलाच मतदान करु शकणार आहेत.(हेही वाचा-Lok Sabha Elections: मतदान नाही तर पगार नाही - पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची कर्मचार्यांना तंबी)
यावर मुख्य निवडणुक आयोगाचे अधिकारी दिलिप शिंदे यांनी असे म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाच्या अंतर्गत जवळजवळ 288 विधानसभेच्या जागेवर 300 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून त्याचा प्रबंध महिलांनी केला आहे. तर महाराष्ट्रात आता पर्यंत 48 लोकसभा जागांसाठी चार टप्प्यातील मतदानापैकी तीन टप्प्यात मतदान पार पडले आहे.