PM Narendra Modi in Wardha | (Photo Credit- Twitter)

Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena), रिपाई (RPI) (आठवले गट) आणि लोजप या एनडीएतील घटक पक्षांच्या प्रचारार्थ वर्धा (PM in Wardha) येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी शरद पवार (Sharad Pawar), अजित पवाह (Ajit Pawar)आणि काँग्रेस (Congress) , राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यासह सर्वच विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष कुंभकर्णासारखे आहेत. दोघांपैकी एक जण 6-6 महिने झोपत असतो, असे सांगतानाच शरद पवार यांचे राष्ट्रवादी पक्षावरील नियंत्रण सुटत चालले आहे. त्यांचा पुतण्या अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कुटुंबातच कलह निर्माण झाला आहे. त्यामुळेच तर त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. शरद पवार हे एके काळी विचार करायचे की, मीसुद्धा पंतप्रधान बनू शकतो. त्यासाठी त्यांनी तशी घोषणाही केली होती. आता मात्र, ते म्हणत आहेत की, मी लोकसभेतच ठिक आहे. याचाच अर्थ वारे कोणत्या बाजूला वाहात आहे हे ते चांगलेच ओळखतात, आसा टोलाही मोदींनी पवार यांना लगावला. (हेही वाचा, कॉंग्रेस सत्तेत आल्यास 2020 पर्यंत 22 लाख सरकारी नोकऱ्या देऊ, राहुल गांधी यांची घोषणा)

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरही टीका केली. अजित पवार यांनी धरणातील पाण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याकडे निर्देश करत मोदी म्हणाले की, पवार यांनी पाण्यासंबंधी जे वक्तव्य केले ते कोणी कसे विसरु शकेल?

एएनआय ट्विट

मी जे करु शकलो ते सर्व आपला आशीर्वाद आहे. काँग्रेसने साफ-सफाई करणारे सर्वसामान्य लोक ते चौकीदारांपैर्यंत सर्वांचा अपमाण केला आहे, असे मोदी म्हणाले. या वेळी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या संशोधकांचेही कौतुक केले.