Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडणार आहे. तर आज मतदानासाठी प्रचारतोफा संध्याकाळी 6 वाजल्याच्या सुमारास थंडावल्या आहेत.
चौथ्या टप्प्यातील मतदान हे महाराष्ट्रातील 17 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. तसेच मुंबई येथील सहा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. देशातील 71 मतदारसंघामध्ये मतदान होणार असून त्यामधील 9 राज्यात मतदान होणार आहे. 29 एप्रिलला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी 3.11 कोटी मतदार मतदान करणार आहेत. तर 323 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम पेटीत बंद होणार आहे.
तर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे (धुळे), उर्मिला मातोंडकर (उत्तर मुंबई), प्रिया दत्त (उत्तर मध्य मुंबई), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई) यांचे भवितव्य पेटीत बंद होणार आहे. तसेच चौथ्या टप्प्यातील हे सर्वजण ठळक चेहरे आहेत.