Lok Sabha Elections 2019: राजकरणात नुकताच काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)) हिला उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उर्मिला हिची भाजप (BJP) उमेदवार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांच्या विरोधात लढत रंगणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उर्मिला हिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे मदत मागितली आहे.
राज ठाकरे यांनी सर्व मनसे (MNS) कार्यकर्त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अप्रत्यपणे या पक्षाला मदत करणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. तर शनिवारी काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा प्रचार करताना मनसे नेते आणि प्रवक्ते शिवाजी पार्क येथे दिसून आले.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसकडून तिकीट जाहीर; उत्तर मुंबई मतदारसंघातून लढवणार निवडणूक)
उर्मिला हिची राज ठाकरे यांच्यासोबत जुनी ओळख आहे. तर उत्तर पश्चिम मुंबई येथून काँग्रेस माजी अध्यक्ष संजय निरुपम निवडणुक लढवणार आहेत. परंतु काँग्रेसला येथे भारदार असा उमेदवार मिळत नव्हता. त्याचसोबत उर्मिला हिला सेलिब्रेटी असल्याचा फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.