Lok Sabha Elections 2019: वेळीच सावध व्हा! आयुष्यभर तुम्हाला पंतप्रधान मोदी,अमित शाह यांचं गुलाम म्हणून राहायचे आहे का? - राज ठाकरे
RajThackeray (File Photo)

MNS Chief Raj Thackeray  speech in Nanded: वेळीच सावध व्हा! आयुष्यभर तुम्हाला पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांचं गुलाम म्हणून राहायचे आहे का? सध्या देशात जे काही चालले आहे ते भविष्याच्या दृष्टीनं चांगलं नाही. मोदी आणि अमित शाह हे पुन्हा सत्तेत आले तर, लोकांचं जीनं हराम करुन टाकतील. मोदी, शाह हे कारभाराची जी पद्धत आवलंबत आहेत ती पद्धत रशीयाची आहे. रशीया हा देश काही पाच, दहा लोकांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे वेळीच योग्य निर्णय घ्या, अशा अत्यंत जहाल शब्दांत मनसे ((MNS)  ) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. राज ठाकरे हे आज (12 एप्रिल) नांदेड येथील जाहीर सभेत बोलत होते. मोदी आणि शाह ही दोन माणसं भारताच्या राजकीय क्षितीजावरुन दूर झाली पाहिजेत, असेही मोदी या वेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी प्रचंड घाबरलेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) बोलण्यापलीकडे काहीही करु शकले नाहीत. गेली पाच वर्षे ते केवळ बोलतच आहेत. दिलेली अश्वासने पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते घाबरले आहेत, अशी थेट टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)  अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली.

'दिलेल्या अश्वासनांवर मोदी चकार एक शब्द बोलायला तयार नाहीत'

पंतप्रधान मोदी हे आजच्या निवडणूक प्रचारात जाहीर सभांमधून दिलेल्या एकाही अश्वासनांवर बोलायला तयार नाहीत. मेक इन इंडिया, योगा, अच्छे दिन, नोटबंदी याच्या निष्पत्तीबद्दल चकार शब्द काढत नाहीत. ज्या गोष्टींवर पंतप्रधान मोदी यांनी जाहिरातींच्या रुपात कोट्यवधी रुपये खर्च केले. त्यावर हा माणूस चकार एक शब्द बोलायला तयार नाही, असेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, नवं मराठी वर्ष मोदीमुक्त भारताचं जावो याच गुढी पाडवा शुभेच्छा: राज ठाकरे)

हे आरडीएक्स आलं कोठून?

पुलवामा येथे झालेल्या झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आरडीएक्स आलं कोठून? या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी का देत नाहीत? या हल्ल्यात जे 40 जवान ठार झाले त्यााल जबाबदार कोण?

या आधी झालेल्या मनसेच्या अनेक मेळाव्यांत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप विरुद्ध जाहीर भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांची आक्रमक भाषा आणि तीव्र शब्दांत केलेला हल्ला. यामुळे भाजप विरुद्ध मनसे असा सामना रंगला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातूनही जोरदार टीका केली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या विरोधात भाजपनेही आपल्या ट्विटर हँडलवरुन अनेकदा व्यंगचित्रं काढत पलटवार केला आहे.

अचानक झटका आला आणि नोटा बंद केल्या

नरेंद्र मोदी यांनी ज्या ज्या गोष्टींना काँग्रेस सरकारला विरोध केला त्या त्या गोष्टी सत्तेत येताच लागू केला. जीएसटी, एफडीआय या गोष्टींना मोदींनी आणि मोदींना तीव्र विरोध केला होता. पण, सत्तेत येताच त्यांनी या गोष्टी लागू केला. अचानक एक दिवस झटका आला आणि नोटा बंद करुन टाकल्या. ज्या गोष्टींचा संबंध नाही असेच काहीतरी मोदी आपल्या भाषणांमधून बोलत असतात. शहीद भगत सिंह हे तुरुंगात असतानात काँग्रेसी परिवारातील कोणीही व्यक्ती भगतसिंह यांना भेटायला गेला नव्हता, असे आरोपत मोदी करतात. पण, हा धडधडीत खोटा आरोप आहे. असे ट्रब्यून या दैनिकातील बातमीचा दाखला देत राज ठाकरे यांनी मोदींवर मुद्देसूद टीका केली.

दरम्यान, राज ठाकरे यानी या आधी जाहीर भाषणातून मोदींवर केलेल्या टीकेनंतर भाजपने बारामतीचा पोपट अशी राज यांची संभावना केली. त्यालाही ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, मनसे भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठींबा देत आहेत, असा त्यांच्यावर आरोप होतो आहे. या सर्व पार्श्वभूमिवर राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे. आजच्या भाषणाने राज ठाकरे यांनी मनसेच्या भूमिकबाबत बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत झाली आहे.