Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2019 रणधुमाळी देशभरात सुरु आहे. महाराष्ट्रही या रणधुमाळीला अपवाद नाही. महाराष्ट्रात (Maharashtra) एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा सदस्यसंख्येचा राज्यनिहाय विचार करता महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. साधारण सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ तयार होतो. आज आम्ही येथे महाराष्ट्रातील महसूल विभाग असलेल्या विदर्भातील लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha Constituencies of Vidarbha) , त्याअंतर्गत येणारे विधानसभा मतदारसंघ (Assembly Constituencies of Vidarbha) आणि आमदारांची यादी (List OF MLA In Vidarbha Assembly Constituencies) त्यांच्या राजकीय पक्षासह देत आहोत. या यादीवर मतदारसंघनिहाय नजर टाकल्यास आपल्याला पक्षीय बलाबल आणि कोणत्या मतदारसंघात कोणाची ताकद अधीक असू शकते याबाबत काही अंदाज बांधता येऊ शकेल.
विदर्भ लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ
संबंधित जिल्हा – बुलढाणा, जळगाव
मतदारसंघ राखीव – खुला
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ – हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस
चिखली विधानसभा मतदारसंघ – राहुल बोंद्रे, काँग्रेस
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ – डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना
मेहकर विधानसभा मतदारसंघ (SC) – डॉ. संजय रायमूलकर, शिवसेना
खामगाव विधानसभा मतदारसंघ – आकाश फुंडकर, भाजप
जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघ – डॉ. संजय कुंटे, भाजप
विद्यमान खासदार – प्रतापराव जाधव, शिवसेना
अकोला लोकसभा मतदारसंघ
संबंधित जिल्हे – अकोला आणि वाशिम
मतदारसंघ राखीव – खुला
अकोट विधानसभा मतदारसंघ– प्रकाश भारसाखळे, भाजप
बाळापूर विधानसभा मतदारसंघ– बळीराम सिरस्कार, भारिप
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ – गोवर्धन शर्मा, भाजप
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ – रणधीर सावरकर, भाजप
मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ (SC) – हरीश पिंपळे, भाजप
वाशिम जिल्हा
रिसोड विधानसभा मतदारसंघ – अमित झनक, काँग्रेस
विद्यमान खासदार – संजय धोत्रे, भाजप
(हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)
यवतमाळ लोकसभा मतदारसंघ
संबंधित जिल्हे – यवतमाळ, वाशिम
वाशिम जिल्हाविधानसभा मतदारसंघ
वाशिम विधानसभा मतदारसंघ (अनुसुचित जाती) – लखन मलिक, भाजप
कारंजा विधानसभा मतदारसंघ– राजेंद्र पाटणी, भाजप
यवतमाळ विधानसभा मतदारसंघ –
राळेगांव विधानसभा मतदारसंघ (अनुसुचित जमाती) – अशोक उईके, भाजप
यवतमाळ विधानसभा मतदारसंघ – मदन येरावार, भाजप
दिग्रस विधानसभा मतदारसंघ– संजय राठोड, शिवसेना
पुसद विधानसभा मतदारसंघ– मनोहर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस
विद्यमान खासदार – भावना गवळी, शिवसेना
अमरावती लोकसभा मतदारसंघ
संबंधित जिल्हा – अमरावती
बडनेरा विधानसभा मतदारसंघ – रवी राणा, अपक्ष
अमरावती विधानसभा मतदारसंघ – डॉ. सुनील देशमुख, भाजप
तिवसा विधानसभा मतदारसंघ– अॅड. यशोमती ठाकुर, काँग्रेस
दर्यापूर विधानसभा मतदारसंघ(SC) – रमेश बुंदेले, अपक्ष
मेळघाट विधानसभा मतदारसंघ (ST) – प्रभुदास भिलावेकर, भाजप
अचलपूर विधानसभा मतदारसंघ– बच्चू कडू, अपक्ष
विद्यमान खासदार – आनंदराव अडसूळ, शिवसेना
वर्धा लोकसभा मतदारसंघ
संबंधित जिल्हे – अमरावती आणि वर्धा
अमरावती जिल्हा
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ – विरेंद्र जगताप, काँग्रेस
मोर्शी विधानसभा मतदारसंघ– अनिल बोंडे, भाजप
वर्धा जिल्हा
आर्वी विधानसभा मतदारसंघ– अमर काळे, काँग्रेस
देवळी विधानसभा मतदारसंघ– सुरेश वाघमारे, भाजप
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ– समीर कुणावार, भाजप
वर्धा विधानसभा मतदारसंघ – पंकज भोयर, भाजप
विद्यमान खासदार – रामदास तडस, भाजप
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
संबंधित जिल्हे – चंद्रपूर आणि यवतमाळ
चंद्रपूर जिल्हा विधानसभा मतदारसंघ
राजुरा विधानसभा मतदारसंघ - संजय धोटे, भाजप
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ (अनुसुचित जाती) – नानाजी शामकुळे, भाजप
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ – सुधीर मुनगंटीवार, भाजप
वरोरा विधानसभा मतदारसंघ– सुरेश धानोरकर, शिवसेना
यवतमाळ विधानसभा मतदारसंघ
वणी विधानसभा मतदारसंघ– संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप
अर्णी विधानसभा मतदारसंघ – राजू तोडसम, भाजप
विद्यमान खासदार – हसंराज अहिर, भाजप
नागपूर लोकसभा मतदारसंघ
संबंधित जिल्हा – नागपूर
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ– देवेंद्र फडणवीस, भाजप
नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ– दिनानाथ पडोळे, काँग्रेस
नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ – कृष्णा खोपडे, भाजप
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ – विकास कुंभारे, भाजप
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ – सुधाकर देशमुख, भाजप
नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ (SC) – डॉ. नितीन राऊत, काँग्रेस
विद्यमान खासदार – नितीन गडकरी, भाजप
रामटेक लोकसभा मतदारसंघ
संबंधीत जिल्हा: मतदारसंघ राखीव
काटोल विधानसभा मतदारसंघ – आशिष देशमुख, भाजप
सावनेर विधानसभा मतदारसंघ – सुनील केदार, काँग्रेस
हिंगणा विधानसभा मतदारसंघ– समीर मेघे, भाजप
उमरेड विधानसभा मतदारसंघ (SC) – सुधीर पारवे, भाजप
कामठी विधानसभा मतदारसंघ– चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
रामटेक विधानसभा मतदारसंघ – डॉ. मल्लिकार्जुन रेड्डी, भाजप
विद्यमान खासदार – कृपाल तुमाने, शिवसेना
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ
संबंधित जिल्हे – गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर
गोंदिया जिल्हा
आमगावविधानसभा मतदारसंघ (ST) – संजय पुरम, भाजप
गडचिरोली जिल्हा
आरमोरी विधानसभा मतदारसंघ (ST) – दामजी कृष्णा, भाजप
गडचिरोली विधानसभा मतदारसंघ (ST) – डॉ. मादगुजी देवराव, भाजप
अहेरी विधानसभा मतदारसंघ (ST) – सत्यवानराव अमरिषराव राजे, भाजप
चंद्रपूर जिल्हा
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ– विजय वडेट्टीवार, काँग्रेस
चिमूर विधानसभा मतदारसंघ – भांगडीया बंटी, भाजप
विद्यमान खासदार – अशोक नेते, भाजप
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ
संबंधित जिल्हे – भंडारा आणि गोंदिया
भंडारा जिल्हा
तुमसर विधानसभा मतदारसंघ– चरण वाघमारे, भाजप
भंडारा विधानसभा मतदारसंघ (SC) – रामचंद्र अवसारे, भाजप
साकरोली विधानसभा मतदारसंघ – राजेश काशीवार, भाजप
गोंदिया जिल्हा
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ (SC) – राजकुमार बडोले, भाजप
तिरोडा विधानसभा मतदारसंघ – विजय रहांदळे, भाजप
गोंदिया विधानसभा मतदारसंघ – गोपालदास अग्रवाल, काँग्रेस
विद्यमान खासदार – मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेस
अशा पद्धतीने महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असलेल्या विदर्भातील लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघातील आमदारांची यादीआहे.