Lok Sabha Elections 2019 First Phase Poll Date: लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदानाचा पहिला टप्पा 11एप्रिल 2019 दिवशी आहे. त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहे. देशात सात तर महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यामध्ये 17 व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक मतदान मतदान होईल. याचा पहिला टप्पा 11 एप्रिल आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ - वाशिम या सात मतदारसंघांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रासह अन्य 20 राज्यांमध्ये एकूण 91 मतदानसंघातील प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे. मतदार यादीमधील तुमचे नाव 'या' पद्धतीने शोधा
महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी चोख व्यवस्था
- पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 116 उमेदवार आहेत.
- सात मतदारसंघात 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार आहेत.
- सुमारे 44 हजार ईव्हीएम यंत्र आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे 73 हजार 837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
- गडचिरोली- चिमूर हा भाग नक्षलग्रस्त असल्याने तेथे मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी करण्यात आली आहे. (नक्की वाचा: महाराष्ट्र राज्य सरकार कडून लोकसभा निवडणुक मतदान दिवशी सुट्टी जाहीर; पहा कोणा कोणाला लागू असेल सुट्टी)
- ज्या मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार आहेत, अशा मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट बसविण्यात येतात. त्यासोबत 1 कंट्रोल युनिट असते. पहिल्या टप्प्याकरिता 26 हजार बॅलेट युनिट आणि 18 हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
चुरसीची लढत
पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये नागपूरात नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले आणि यवतमाळ वाशिममध्ये भवाना गवळी विरूद्ध माणिकराव ठाकरे यांच्यामधील लढत चुरशीची होणार आहे. (नक्की वाचा: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मतदान पहिला टप्पा तारीख, मतदारसंघ आणि उमेदवार यादी)माध्यमांशी बोलताना नितीन गडकरी यांनी किमान 5 लाख माताधिक्क्याने जिंकून येऊ असा विश्वास बोलून दाखवला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावेल. 11 एप्रिलला मतदान होईल तर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.