Lok Sabha Elections 2019: सुजय विखे यांच्या पत्नी निवडणुक लढवणार? भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल
Sujay Vikhe (Photo Credits-Twitter)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर (Ahamadnagar) मतदार संघाकडून सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने मुदतीपूर्वी 10 मिनिटे आधी धनश्री विखे (Dhanashree Vikhe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

धनश्री विखे यांनी कोणत्याही प्रकाराचा गाजावाजा न करता जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अर्ज दाखल केल्याचे सांगितले जात आहे. तसेच सुजख विखे यांच्या उमेदवारी अर्जासाठी अडचण येत असल्याने पर्याय म्हणून धनश्री विखे यांनी अर्ज दाखल केला असल्याचे म्हटले जात आहे. परंतु राजकीय वर्तुळात धनश्री विखे यांनी अर्ज भरल्या कारणास्तव चर्चा सुरु झाली आहे.(हेही वाचा-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला निधनानंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी सुजय विखे यांचे फोटोसेशन, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त)

अहमदनगर येथून यापूर्वीच सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर आता धनश्री पाटील यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरल्यामुळे तो डमी अर्ज असल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजप पक्षात प्रवेश करताना सुजय विखे यांच्यासोबत धनश्री विखे सुद्धा दिसून आल्या होत्या.