Kirit Somaiya and Manoj Kotak (Photo Credits-Facebook)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबई (Mumbai North East Lok Sabha constituency) येथून खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा पत्ता कट झाला असून त्याजागी आता मनोज कोटक (Manoj Kotak) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच उमेदवारी अर्जासाठी किरीट सोमय्या यांच्या नावासाठी शिवसेनेकडून सातत्याने विरोध केला जात होता. तसेच सोमय्या यांची भेट शिवसेनेने नाकारली होती.

महापालिका निवडणुकी दरम्यान, किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही वक्तवे केली होती. त्यामुळेच शिवसेनेकडून सोमय्या यांना उमेदवारी देण्यास नकार दिला जात होता. तसेच सोमय्या यांच्याकडून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. परंतु उद्धव ठाकरे यांच्या कडून भेटीसाठी नकार आल्याने सोमय्या यांची निराशा आणखीनच वाढली होती.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: किरीट सोमय्या यांचा भाजप उमेदवार यादीतून पत्ता कट? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील व्यक्तिगत टीका भोवल्याची चर्चा)

तर शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी सोमय्या यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात निवडणुक लढवणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र आज अखेर मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.