 
                                                                 लोकसभा निवडणुक 2019 चे निकाल काल (23 मे) जाहीर झाल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा बालेकिल्ला बारामती (Baramati) येथून सुप्रिया सुळे यांचा मताधिक्याने विजय झाला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत एक भावनिक ट्वीट केले आहे.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट मध्ये असे लिहिले आहे की, ''श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचे पाणी, लढणाऱ्या लेकेसाठी, बाप बुलंद कहाणी'' असे भाविनिक शब्दात विजयानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.(Lok Sabha Election Results 2019: सातारा इथे उदयनराजे भोसलेंची सत्ता अबाधित; शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचा 12 हजार मतांनी पराभव)
श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी;
लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!
— Supriya Sule (@supriya_sule) May 23, 2019
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध भाजप उमेदवार कांचन कुल यांच्यामध्ये लढत रंगली होती. मात्र जाहीर झालेल्या निकालात सुप्रिया सुळे यांना लाखोंच्या मताधिक्याने विजयी झाला आहे. तर भाजपच्या कांचन कुल यांचा बारामती येथे पराभव झाला आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
