Photo Credit -X

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी राज्यातील १३ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. एकीकडे अनेक राजकीय नेत्यांनी, कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्वसामान्य नागरिक त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे आहे. तर, दुसरीकडे नाशिक लोकसभेचे (Nashik Lok Sabha)अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज(Shantigiri Maharaj)यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र, मतदानाआधी त्यांनी ईव्हीएम मशीनला हार घातला(Garlanded EVM). त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (हेही वाचा:Lok Sabha Election 2024 Phase 5: मुंबई, ठाणे, नाशिक, रायबरेलीसह ४९ जागांवर आज ५व्या टप्प्यात मतदान, 'या' दिग्गजांचं भवितव्य पणाला )

नाशिक येथील मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शांतीगिरी महाराज मतदान केंद्रावर पोहचले होते. मात्र, यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनला हार घातल्याने चर्चेला उधाण आले. शांतिगिरी महाराजांचा ईव्हीएम मशीनला हार घालतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला हार घातल्याची राज्यातील पहिलीच घटना नाही. यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील ईव्हीएम मशीनची पूजा केली होती. यावरून चाकणकर यांना बऱ्याच टीकेला सामोर जावं लागलं होतं. त्यामुळे आता शांतिगीरी महाराजांच्या अडचणीत वाढ होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

'मतदान पवित्र आहे. या यंत्राजवळ येऊन मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे सर्वांना सद्बुद्धी व्हावी. आपलं मत भारत मातेच्या कामात यावा, म्हणून पवित्र हार आम्ही इव्हीएम मशिनला घातला', असं शांतिगिरी महाराजांनी म्हटलं.