Lok Sabha Election 2024: देशाची 18 वी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024)मतमोजणी अगदी धुमधडाक्यात पार पडत आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी 10 वाजेपर्यंतचे कल हाती आले असून काँग्रेसचे शामकुमार बर्वे हे आघाडीवर होते. शामकुमार बर्वे (Shyamkumar Barve) हे 16,000 मतांनी आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकारवर शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे (Raju Parwe) आहेत. हा कल सकाळी 10 वाजेपर्यंतचा असून अजून अंतिम निकालही अवघ्या काही तासांत हाती येण्यास येईल. (हेही वाचा:Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील 3 केंद्रीय मंत्री पिछाडीवर; नारायण राणे, भारती पवार आणि कपिल पाटील पिछाडीवर )
देशाला पंतप्रधान मिळवून देणारा मतदारसंघ अशी रामटेकची ओळख आहे. रामटेकचा गड आजपर्यंत शिंदे गटाने राखला होता. ते आपल्याकडेच राहावा, यासाठी भाजपने खूप प्रयत्न केले, पण शेवटपर्यंत शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघावरील आपला हक्क सोडला नाही. ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात आलेले शामकुमार बर्वे (Shyamkumar Barve) आणि शिंदे गटाचे नेते राजू पारवे (Raju Parwe) यांच्यात जोरदार लढत होत आहे.
उमेदवार बदलणं पडलं महागात?
शिंदे गटाला रामटेकमध्ये उमेदवार बदलणं महागात पडले काय असा सवाल उपस्थित होत आहे. या मतदारसंघात मागील सलग दोन टर्म कृपाल तुमाने जिंकून आले. मात्र यावेळी खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापण्यात आलं. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात शिंदे गटाने काँग्रेसमधूल आलेले राजू पारवे यांना उमेदवारी दिली. परंतु, राजू पारवे यांच्यापेक्षा कृपाल तुमाने चांगले असल्याचं जनतेचं म्हणणं आहे. त्यामुळे या निर्णयाचा शिंदे गटाला फटका बसणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.