Lok Sabha Election 2024 Satara Constituency : 'शरद पवारांकडून आदेश आल्यास निवडणूक लढायला तयार'; पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले
Photo Credit - Facebook

Lok Sabha Election 2024 Satara Constituency : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)आणि महायुतीमधला काही जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात सातारा मतदार संघ जास्तच चर्चेत आला आहे. महायुतीकडून साताऱ्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. पण त्यांना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. तर महाविकास आघाडीत सातारा मतदार संघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी (NCP Sharad Pawar Group)च्या वाट्याचा आहे. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) ना त्या जागेसाठी साजेसा उमेदवार मिळत नाहीये. महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडींवर खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (हेही वाचा : Loksabha Election 2024 Satara Constituency: साताऱ्यात चुरशीची लढत! शरद पवार थेट पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याची शक्यता )

'साताऱ्यातून माझ्या नावाची चर्चा सुरू नाही. कारण ही जागा शरद पवार गटाची आहे. मीडियामध्ये माझं नाव घेतलं जात आहे. शरद पवार यांनी आदेश दिला तर मी लढायला तयार आहे. हा निर्णय शरद पवार यांचा आहे. मला खात्री आहे की, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीत जातीयवादी विचार येणार नाही, त्यासाठी शरद पवार आणि आम्ही कटिब्ध आहोत', असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, 'साताऱ्यातून काँग्रेस उमेदवार देणार नाही. हा प्रश्न स्थानिक आहे. याचा निर्णय शरद पवार यांनी घ्यायचा आहे. सर्वात सक्षम उमेदवार कोण आहे हे शरद पवार ठरवतील. त्यात जो काही निर्णय होईल तो सर्वमान्य होईल. साताऱ्याबाबतचीही चर्चा सुरू आहे. जयंत पाटील काल मला भेटले. हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे आहे. इथला उमेदवार त्यांनी ठरवायचा आहे. ते जो उमेदवार देतील त्याच्यासाठी ताकदीने काम करायची आमची तयारी आहे. जातीयवादी पक्ष या मतदारसंघात येणार नाही यासाठी शरद पवार सांगतील ते काम करायला आम्ही तयार आहोत', असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.