Lok Sabha Election 2019: मनसेच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा पाच वर्षात मारलेल्या थापा मोजा - राज  ठाकरे यांचा भाजपाला टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य-फेसबुक)

Raj Thackeray Solapur Rally: लोकसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Lok Sabha Election) महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत आहेत. यंदा लोकसभेच्या निवडणूकीमध्ये मनसे (MNS) थेट मैदानात उतरली नसली तरीही महाआघाडीला मदत करत आहे. 'मोदी - शहा' मुक्त भारत करण्यासाठी मतदरांना आवाहन करत सध्या महाराष्ट्रभर राज ठाकरे (Raj Thackeray) सभा घेत आहेत. यादरम्यान आज सोलापूरमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा भाजपाला (BJP) लक्ष्य केलं आहे.

 राज ठाकरे सोलापूर भाषण 

 प्रचार सभांचा खर्च कुणाचा? 

राज ठाकरे यांनी भाजपा सरकार थापा मारत असल्याचा पुनरूच्चार केला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची प्रचारसभा कोणासाठी असा प्रश्न उपस्थित केला होता. राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी अश्विनी कुमार यांना पत्र लिहून त्यांनी राज ठाकरेंच्या प्रचाराचा खर्च कोणाच्या खात्यात लिहणार? असा प्रश्न विचारला होता. मात्र यावर उत्तर देताना आता मनसेच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा पाच वर्षात मारलेल्या थापा मोजा असा टोला लगावला आहे. राज ठाकरे यांच्या प्रचारसभा कोणासाठी? विनोद तावडे यांचे मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांना पत्र

मनसे ट्विटस

सोलापूरच्या सभेमध्ये हरीलसालच्या डिजिटल गावाचं वास्तव त्यावर मुख्यमंत्र्यांनी गाव डिजिटल झालं असलेल्या केलेल्या दाव्याचा खरपूस समाचार घेत त्या जाहिरातीमध्ये झळकलेल्या मुलालादेखील स्टेजवर आणलं.

MNS Tweets (Photo Credits: Twitter)

राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्यानुसार, जाहिरातीतील तरूण बेरोजगार असून कामासाठी पुण्यात आला आहे. मनसेसैनिकांनी त्याचा शोध घेतला असून जाहिरातीतील दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. देंवेंद्र फडणवीस सह भाजपा नेते अनेक विकासाचे अनेक खोटे दावे करत असल्याचं राज ठाकरे यांचं मत आहे.

राज ठाकरे पुढील सभा कोल्हापूर, सातारा,पुणे, रायगड येथे घेणार आहेत.   राज ठाकरे किंवा मनसेने थेट महाआघाडीला पाठिंबा दिला नसला तरीही महाराष्ट्र्रभर मोदी सरकारविरुद्ध प्रचार करणार असल्याचं जाहीर केलं आहे.