महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी म्हणजेच 31 मे 2021 पर्यंत वाढविण्या बाबत (Lockdown in Maharashtra) राज्याच्या आरोग्य विभागाने आणि अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवला आहे. त्यामळे लॉकडाऊन वाढविण्याबात राज्य सरकार अनुकुल आहे. परंतू, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटले आहे. याशिाय 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरणही (Corona Vaccination) तूर्तास थांबविण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना पुढीचा डोस देण्यासाठी हे लसीकरण 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास थांबविण्यात आले आहे. जेणेकरुन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांना याच लसीचा पुढचा डोस घेणे सोपे होईल.
दरम्यान, लॉकडाऊन आणि मुंबई लोकल बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील. तसेच, लॉकडाऊन बाबतची अंतमि नियमावली येत्या एक ते दोन दिवसांमध्ये जाहीर होईल. तूर्तास सध्या आहे तिच नियमावली कायम राहणार असल्याचेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन आणखी काही दिवस पुढे वाढवावा असे मत मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी व्यक्त केले. राज्यातील लसीकरण गतीने करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत सीरमच्या अदर पुनावाला यांनी चर्चा केली आहे. येत्या 20 मे नंतर कोरोना लसीचे 20 लाख डोस महाराष्ट्राताल देता येऊ शकतील असे अश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे राजेश टोपे यांनी या वेळी सांगितले.
At the Cabinet meeting, the health department & ministers proposed to extend the lockdown for 15 days. The chief minister will take a final decision on this matter: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/tjIEQZ8YLg
— ANI (@ANI) May 12, 2021
दरम्यान, लॉकडाऊन काळात मुंबईमध्ये लोकल ट्रेन प्रवासात काही सवलत मिळू शकते का? असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता राजेश टोप म्हणाले, मुंबई लोकल आणि इतर विषयांवर मुख्यमंत्रीच भाष्य करतील. परंतू, इतक्यात मुंबई लोकलमध्ये सवलत मिळण्याची शक्यता तशी कमीच वाटते आहे, असेही राजेश टोपे या वेळी म्हणाले.