ठाणे (Thane) जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या (Coronavirus In Thane) प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉक डाऊन (Lockdown) आज पासून कंटेनमेंट झोन (Containment Zone) पुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे , कल्याण- डोंबिवली (Kalyan- Dombivli), भिवंडी (Bhiwandi) महानगरपालिकेतील कंटेनमेंट झोन मध्ये आज पासून ते 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन कायम असणार आहे. या संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यात 18 जुलै पर्यंत एकूण 65,927 कोरोना रुग्ण आढळले आहेत यातील 1870 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. अजूनही कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे अशावेळी नव्याने निर्माण होणाऱ्या कंटेनमेंट झोन मध्ये खबरदारी घेणे आवश्यक आहे, यासाठी थेट लॉक डाऊन लागू करण्याचा पर्यायाय पालिकेने निवडला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आणि मृत्यूंची आकडेवारी जाणून घेण्यासाठी हा तक्ता तपासून पहा.
अ.क्र | महापालिका विभाग | कोरोनाबाधित रुग्ण | मृत्यु |
1 | ठाणे | 10,503 | 212 |
2 | ठाणे मनपा | 17,226 | 623 |
3 | नवी मुंबई मनपा | 12,929 | 348 |
4 | कल्याण डोंबिवली मनपा | 18,115 | 305 |
5 | उल्हासनगर मनपा | 5855 | 96 |
6 | भिवंडी निजामपूर मनपा | 3310 | 226 |
7 | मीरा भाईंदर | 7173 | 226 |
दरम्यान, महाराष्ट्रात सुद्धा काल कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली होती, कालच्या दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा 9 हजार 518 नव्या रुग्णांसह वाढली असून दिवसभरात 258 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 10 हजार 455 वर पोहचली आहे. यापैकी 11 हजार 854 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 69 हजार 569 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे
.