Aurangabad Shocking Video: संभाजीनगरमध्ये एम्स रुग्णालयाजवळ स्थानिकांचा डॉक्टर व पोलिसांवर हल्ला; तिघांना अटक
Locals attack doctor and police (PC - Twitter)

Aurangabad Shocking Video: औरंगाबाद (Aurangabad) (संभाजी नगर) सिडकोच्या एम्स रुग्णालयाजवळ (CIDCO's AIMS Hospital) शनिवारी संध्याकाळी एका ड्युटी डॉक्टरचा फोन आल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी डॉक्टरांना आणि पोलिसांना मारहाण केली. हा गोंधळ कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरला आहे.

प्राप्त माहितीनुसार, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत पोलिसांनी सुरुवातीला आरोपीला रस्त्याच्या मधोमध गाडी काढून बाजूला उभी करण्यास सांगितले. मात्र, या व्यक्तीने त्याचा इन्कार करत आक्रमक शेरेबाजी केली, तसेच हॉस्पिटलला आग लावण्याची धमकीही पोलिसांना दिली. (हेही वाचा - Beed Raped Case: धावत्या जीपमध्ये विवधा महिलेवर दोघांनी केला बलात्कार, संतापजनक घटनेमुळे बीड हादरले)

आरोपीने एका पोलिसाची कॉलर पकडून त्याला ओढत नेऊन जमावासमोर बेदम मारहाण केली. या प्रकरणी शिवानंद गजानन मोरे, गजानन मोरे, विजया गजानन मोरे अशी तीन आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. या तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.