Beed Raped Case: धावत्या जीपमध्ये विवधा महिलेवर दोघांनी केला बलात्कार, संतापजनक घटनेमुळे बीड हादरले

विवधा महिलेला चप्पल आणि पाईपने मारहान करत तीच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे,

Beed Raped Case: धावत्या जीपमध्ये विवधा महिलेवर दोघांनी केला बलात्कार, संतापजनक घटनेमुळे बीड हादरले
Raped (representationla image)

Beed Raped Case:  बीड (Beed) जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. धावत्या जीपमध्ये विधवा महिलेवर दोन नराधमांनी बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसर संपुर्ण हादरले आहे. धक्कादायक म्हणजे नराधमांनी हे कृत्य तिच्या प्रियकरसमोर केले. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितीने दिलेल्या तक्रारीनुसार चार जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत महिलेला चप्पलेने आणि पाईपने देखील मारहाण केल्याचे पोलीसांत सांगितले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत महिलेचा नवरा पा वर्षांपूर्वी मरण पावला. तीन वर्षांच्या मुला सोबत बीड येथे राहू लागली. काही वर्षापुर्वी महिलेला एका व्यक्तीसी प्रेम झाले. त्याच्यात प्रेमसंबंध सुरु झाले. सुरेश लंबाटे हा प्रियकर सात्रापोत्रा येथील रहिवासी होता. शुक्रवारी (दि ४) फिर्यादी ही रस्त्यावरून पायी जात होती. दरम्यान सुरेश एक गाडी घेवून आला. त्याने तीला गाडीच बसण्यास सांगितले. गाडीत सुरेशचा मोठा भाऊ अमोल आणि वडील बापूराव दोघेही उपस्थित होते. सुरेश समोरच पीडित महिलेवर दोघांनी मारहाण सुरु केली. तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर गाडी सात्रापोत्रा गावात आणताच सुरेशच्या पत्नीने पीडित महिलेला गाडी खाली उतरवत पाईप आणि चप्पलने मारहाण केली. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला. पीडित महिलेला पोलीसांनी सरकारी रुग्णालयात दाखल केलेय. या घटनेसंदर्भात पोलीस तपासणी करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपींवर मारहाणीचा आणि बलात्कार अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2023 01:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).