Pune: अंधश्रद्धेचा कळस! महिलेला सर्वांसमोर नग्न अंघोळ करण्यास भाग पाडले; पती, सासू-सासऱ्यासह मांत्रिकाला अटक

आता पती शिवराज गोरडकर, सासरे राजेंद्र कोरटकर, सासू चित्ररेखा कोरटकर यांनी मांत्रिक बाबा जमादार यांच्या सांगण्यावरून पीडित महिलेला रायगड जिल्ह्यामध्ये एके ठिकाणी नेले. तिथे मांत्रिकासह सर्वांच्यासमोर तिला नग्न होऊन अंघोळ करण्यास भाग पाडले.

Pune: अंधश्रद्धेचा कळस! महिलेला सर्वांसमोर नग्न अंघोळ करण्यास भाग पाडले; पती, सासू-सासऱ्यासह मांत्रिकाला अटक
Black Magic | (File Photo)

अंधश्रद्धेला बळी पडून अनेक धक्कादायक प्रकार घडल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. आता राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे येथे मांत्रिकाने कुटुंबीयांसमोर महिलेला नग्न होऊन अंघोळ करायला लावण्याचा प्रकार घडला आहे. घरातील भानामती नाहीशी व्हावी, व्यवसायामध्ये भरभराटी यावी आणि घरांमध्ये सुख शांती नांदावी यासाठी मांत्रिकाने महिलेला सासू-सासरे व नवऱ्यासमोर नग्न अंघोळ करायला भाग पाडले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये पीडित महिलेचा आरोपी पती शिवराज गोरडकर याच्या बरोबर विवाह झाला होता. लग्नानंतर घरच्या लोकांनी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी तिच्यासोबत अनिष्ठ गोष्टीही करण्यास सुरुवात केली. पिडीतेचा शारीरिक व मानसिक छळ केला गेला. तिच्याकडून लाखो रुपयांची मालमत्ता हडप केली. तिच्या आई-वडिलांकडून लग्नात मिळालेले दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे बँकेत ठेऊन त्यावर 75 लाखांचे कर्ज घेतले. (हेही वाचा: Nanded Shocker: आईनेच पोटच्या मुलाच्या खूनासाठी भाडेकरूंना दिले 50 हजार रूपये; तिघांना अटक)

आता पती शिवराज गोरडकर, सासरे राजेंद्र कोरटकर, सासू चित्ररेखा कोरटकर यांनी मांत्रिक बाबा जमादार यांच्या सांगण्यावरून पीडित महिलेला रायगड जिल्ह्यामध्ये एके ठिकाणी नेले. तिथे मांत्रिकासह सर्वांच्यासमोर तिला नग्न होऊन अंघोळ करण्यास भाग पाडले. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2022 05:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).