Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Local Mega Block : आज बाहेर फिरण्याची तयारी करत असलेल्या मुंबईकरांसाठी खास बातमी समोर आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस सुरक्षा वाढवण्यात येत असतानाच आता रेल्वेने काही भागात मेगाब्लॉक (MegaBlock) घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील हार्बर (Harbour line)आणि मध्य मार्गावर (Central Line) आज सकाळपासून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईकरांना लोकल सेवेच्या मेगाब्लॉक मुळे त्रास सहन करावा लागणार आहे. सेंट्रल आणि हार्बर लाईन्सवर मेगाब्लॉकची शक्यता दर्शवली आहे.

मुंबईतील सेन्ट्रल मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय हार्बर लाईनवर सकाळी 11.15 ते सायंकाळी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर बाहेर फिरण्याची इच्छा होत असलेल्या मुंबईकरांना आज मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल सेवाचा मेगाब्लाॉक राहील्याने आणखी ताण पडण्याची शक्यता आहे.

हार्बर लाइनवर सकाळी 11.15 ते 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सर्वात मोठा हार्बर लाईनवर मेगाब्लॉक असेल. मानखुर्द, नेरुळ अप आणि डाउन मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळं सीएसटीहून सकाळी 10.15 ते 3.28 वाजेपर्यंत सुटणाऱ्या सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहे. सीएसटीहून वाशी-बेलापूर-पनवेलसाठी जाणाऱ्या आणि तेथून सीएसटीसाठी येणाऱ्या लोकलही रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.